ही गोष्ट नव्हे तर ‘मिसाल’ ! ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या मिशन मंगलचा ट्रेलर ‘आउट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १५ ऑगस्ट रोजी अक्षय कुमारचा मिशन मंगल हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत विद्या बालन, तापसी पन्नू, शरमन जोशी, किर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. जगन शक्ती यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. आज (गुरुवार दि.१८ जुलै) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

सत्य घटनेला प्रेरीत होऊन हा सिनेमा तयार करण्यात आला आहे असे सांगितले जात आहे. मिशन मंगल सिनेमात दाखवण्यात आलं आहे की, कशा प्रकारे भारताचे दोन साइंटिस्ट राकेश धवन(अक्षय कुमार) आणि तारा शिंदे(विद्या बालन) आणि त्यांची टीम पहिल्याच प्रयत्नात मंगळावर सॅटेलाईट पाठवण्यास यशस्वी होतात.

कसा आहे ट्रेलर ?

अक्षय कुमारने ट्रेलर शेअर करत म्हटले आहे की, “ही फक्त एक गोष्ट नाही, तर एक मिसाल आहे. त्या अशक्य गोष्टीची जी भारताने शक्य करून दाखवली. या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात होते. ती म्हणजे दोन मिनिटांच्या काऊंटडाऊनने. यानंतर पहिला आवाज ऐकायला येतो. तो म्हणजे अक्षय कुमारचा. अक्षय कुमार म्हणजेच सिनेमातील राकेश धवन म्हणतो की, “जर आपण प्रयोग केला नाही. तर आपल्याला साइंटिस्ट म्हणवून घेण्याचा काहीच अधिकार नाही. यानंतर मिशन मंगलला सुरुवात होते. ही खरी कहाणी सिनेमात शानदार पद्धतीने दाखवण्यात आली आहे.

या ट्रेलरमध्ये जवळपास सर्वच भूमिकांचा परिचय देण्यात आला आहे. तापसी पन्नू, विद्या बालन, शरमन जोशी, किर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन यांच्याही भूमिका यात दिसत आहेत.