नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ भाषणाची निवडणूक आयोग तपासणी करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मिशन शक्ती मोहीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले भाषण निवडणूक आयोगाकडून तपासण्यात येणार आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने काढले आहे. मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी करण्यात येणार आहे. माकपने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.

क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याच्या ‘मिशन शक्ती’ या भारताच्या यशस्वी मोहीमेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रसामाध्यमांद्वेरे देशाला दिली. निवडणूक आचारसंहिता असताना मोदींनी केलेल्या या भाषणावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. मोदींच्या भाषणाची प्रत आयोगाने मागितली आहे. याची तपासणी निवडणूक आयोगाच्या चौकशी समितीतील अधिकारी करणार आहेत.

मोदींनी भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप माकपने केला आहे. या प्रकरणी माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित लेखी तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. तसंच निवडणूकीच्या काळात त्यांनी भाषण केले आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असं येच्युरी यांनी पत्रात म्हटलं आहे.