धार्मिक स्थळाचा वापर केल्याने माजी पोलिस अधिकार्‍यासह चौघांवर FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक प्रचारात धार्मिक स्थळाचा गैरवापर करणे एका मोजी पोलिसाला भोवले आहे. नगर तालुक्यातील चिंचोली भागात हा प्रकार घडला. निवडणूकी दरम्यान प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा वापर करत त्या ठिकाणी भाषणबाजी केल्यामुळे माजी पोलीस उपअधीक्षकासह, नवनिर्वाचित सरपंच यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांसह एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व पॅनलचा प्रचार प्रमुख अशा चौघाजणांवर एम. आय. डी. सी पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दाखल करण्यात आलेल्या गुन्हात निवृत्त पोलीस उपअधीक्षक यादवराव रभाजी आव्हाड, विद्यमान नवनिर्वाचित सरपंच अनिल उर्फ महेश पांडूरंग आव्हाड यांचा समावेश आहे. यात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य धर्मनाथ आनंदा आव्हाड यांच्या पॅनलचे प्रचार प्रमुख किसन सावळेराम आव्हाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चौघांनी आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गावातील अविनाश भानुदास आव्हाड यांनी तक्रार दिली होती. या चौघांकडून निवडणूक प्रचार करताना धार्मिक स्थळाचा वापर केला असल्याने अविनाश आव्हाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like