लस नाही बनली तर भारतात 2021 मध्ये दररोज आढळणार ‘कोरोना’चे 2.87 लाख रूग्ण, MIT च्या रिसर्चचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधनानुसार, कोरोनो व्हायरस महामारीचा सर्वात वाईट टप्पा अजून बाकी आहे. भारतात कोरोना लस किंवा औषधाशिवाय येत्या काही महिन्यांत कोविड-१९ च्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ दिसू शकते. संशोधनानुसार, २०२१ च्या अखेरपर्यंत दररोज २.८७ लाख प्रकरणे आढळतील आणि भारत जगातील सर्वाधिक प्रभावित देश बनू शकतो. एमआयटीच्या स्लोन स्कुल ऑफ मॅनेजमेंटचे हाजी रहमानंद, टीआय लिम आणि जॉन स्टेरमॅन यांच्याकडून आयोजित अभ्यासात म्हटले गेले आहे की, अमेरिकेत दररोज ९५,४००, दक्षिण आफ्रिकेत २०,६००, इराणमध्ये १७,०००, इंडोनेशियामध्ये १३,२००, ब्रिटनमध्ये ४,२००, नायजेरियामध्ये ४,००० प्रकरणे आढळत आहेत.

अभ्यासानुसार, उपचार किंवा लसीकरणा अभावी ८४ देशांमध्ये २०२१ पर्यंत २४९ मिलियन (२४.९ कोटी) प्रकरणे आणि १७.५ लाख मृत्यू होऊ शकतात. तसेच असेही म्हटले आहे की, सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व पुन्हा सांगितले गेले आहे. भविष्यात कोरोना संसर्गाची ही आकडेवारी चाचणीवर नाही, तर संक्रमण कमी करण्यासाठी सरकार आणि सामान्य माणसाच्या इच्छा शक्तीवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. एमआयटीच्या संशोधकांनी आकडेवारीच्या अंदाजासाठी SEIR (Susceptible, Exposed, Infectious, Recovered) मॉडेलचा वापर केला.

एसईआयआर हे प्रमाणित गणिताचे मॉडेल आहे, जे विश्लेषणासाठी महामारी तज्ञांकडून वापरले जाते. अभ्यास तीन घटकांमध्ये केला जातो. पहिले सध्याचा चाचणी दर आणि प्रतिसाद. दुसरे जर चाचणी १ जुलैपासून दररोज ०.१ टक्के वाढते. तिसरे जर चाचणीचा डेटा सद्य स्थितीत राहिल्यास, एका व्यक्तीपासून संक्रमण पसरण्याचे प्रमाण आठ आहे. एमआयटीचे हे संशोधन जगातील ६० टक्के लोकसंख्या (४.७५अब्ज लोक) असणार्‍या ८४ देशांच्या अभ्यासावर आधारित आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, जागतिक कोविड-१९ प्रकरणांची एकूण संख्या ११.७ मिलियनहून अधिक झाली आहे, तर मृत्यू ५४३,००० आहेत.