तुमच्या हातात असतील स्वप्न, शास्त्रज्ञ तयार करत आहेत ड्रीम हॅक करण्याचा डिव्हाइस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सर्वांनाच स्वप्न पडतात, परंतु त्यावर आपले नियंत्रण नसते. इच्छा असूनही चांगली स्वप्न सतत पाहू शकत नाही. एखाद्या वाईट स्वप्नापासून सुटका मिळू शकत नाही. मात्र, भविष्यात हे शक्य आहे की, तुम्ही तुमची स्वप्न कंट्रोल करू शकता, ते सुद्धा हातात एक छोटाचा डिव्हाइस घालून. म्हणजे तुम्ही तुमची चांगली स्वप्न जास्त वेळ पाहू शकता आणि वाईट स्वप्नांना हटवू शकता. अमेरिकन शास्त्रज्ञ अशाप्रकारचा डिव्हाइस बनवण्याचे काम करत आहेत.

मॅसाच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे शास्त्रज्ञ स्वप्न हॅक करण्याच्या प्रयोगात जुंपले आहेत. यासाठी एमआयटीच्या ड्रीम लॅबमध्ये डिव्हाइस बनवला जात आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही स्वप्न हॅक करू शकता. ते बदलू शकता आणि त्यावर नियंत्रण करू शकाल. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या कंटेटचे मालक असाल.

एमआयटी ड्रीम लॅबचे शास्त्रज्ञ एडम होरोविट्ज यांनी सांगितले की, ज्यांच्या जीवनाचा एक भाग स्वप्न पहाण्यात जातो. या स्वप्नावर जर कंट्रोल करता आले तर त्यांचे आयुष आणखी उजळेल. तुम्ही रात्री वाईट स्वप्न पाहून सकाळी अस्वस्थ होता. अनेकदा विसरण्याचा प्रयत्न करूनही अशी स्वप्न डोक्यावर परिणाम करतात. आम्हाला अपेक्षा आहे की यामुळे मनुष्याच्या मेंदूची क्षमता वाढेल.

या डिव्हाइसचे नाव डोरिमो आहे. हे हात मोज्यांप्रमाणे हातात घालता येते. यामध्ये अनेक प्रकारचे सेन्सर्स लावलेले आहेत. डोरिमो झोपताना मनुष्याच्या स्थितीची तपासणी करते. तो शोधतो की, झोपलेला मनुष्य जागृतावस्थेत आहे की अर्ध जागृतावस्थेत आहे. जेव्हा मनुष्य याच्या मधल्या स्थितीत राहातो तेव्हा त्यास हिप्नागोगिया म्हणतात. सध्या याची ट्रायल 50 लोकांवर केली जात आहे. या डिव्हाइसमध्ये आणखी बदल करणे बाकी आहे.

डोरिमो हिप्नागोगियामध्ये झोपलेल्या मनुष्याच्या मेंदू तयार झालेल्या प्रतिमा आणि आभासाला नियंत्रित करण्यात मदत करते. हिप्नागोगियाच्या स्थितीत मनुष्याला चांगल्या प्रतिमा दिसतात. म्हणजे स्वप्न याच वेळी येतात. त्यास आवाज ऐकू येतात. किंवा घटनेचा आभास होतो. अनेकदा व्यक्ती या स्थितीत अशी कामे करतो जी प्रत्यक्षात केलेली असतात, किंवा करण्याची इच्छा असते.