Mitali Mayekar | ‘या’ मराठी अभिनेत्रीने शेअर केला आंघोळ करतानाचा बोल्ड फोटो

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही जोडी मराठी कलाविश्वात लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. हे दोघे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अभिनेत्री मिताली मयेकरचे (Mitali Mayekar) फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मितालीने अलीकडेच शेअर केलेल्या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिचा हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का देखील बसला आहे.

मिताली मयेकर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या मिताली मध्य प्रदेशात फिरण्यासाठी गेली आहे.
मिताली ही व्याघ्र सफारीचा सध्या आनंद लुटताना दिसत आहे. या वेळीच तिने एक फोटो शेअर केला. तिच्या या फोटोने सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘अपवित्र’ असे म्हटले आहे. तर मितालीने (Mitali Mayekar) आंघोळ करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो बांधवगड जंगल सफारीदरम्यानचा असल्याचे दिसत आहे. मितालीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला अनेक सल्ले दिले आहेत. तर अनेकांनी तिच्या फोटोला लाईक देखील केले आहे.

मितालीने वयाच्या 13 व्या वर्षी इरफान खानच्या ‘बिल्लू’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
त्यानंतर तिने ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’ आणि ‘तू माझा सांगाती’ अशा
मराठी मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत.
याचबरोबर ती ‘उर्फी’ या चित्रपटात देखील दिसली होती. मितालीने 2016 मध्ये ‘फ्रेशर्स’ या मालिकेतून
सायली बनकर ही भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
आता ती टेलिव्हिजनवर ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत कस्तुरीची भूमिका साकारत पुन्हा एकदा घराघरात पोहोचली आहे.

Web Title :- Mitali Mayekar | siddharth chandekar wife marathi actress mitali mayekar shared bold photo taking bath

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Budget Session 2023 | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी, देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं, म्हणाले- ‘आम्ही हे खपवून घेणार नाही, हे…’

Pune Crime News | झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून शहरातील 2 सराईत गुन्हेगार तडीपार

MNS Chief Raj Thackeray | ‘राज ठाकरेंनी वाचन वाढवावं’ म्हणाऱ्यांना राज ठाकरेंचा टोला, म्हणाले – ‘मी जेव्हा चार दुऱ्या टाकतो, तेव्हे ते…’