मिताली राजनं साडी घालून केली ‘बॅटिंग’, महिला T-20 WC च्या फायनल मॅचपुर्वी महिलांना दिला संदेश (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती चक्क साडी नेसून किक्रेटच्या मैदानात उतरल्याचे दिसत आहे. एवचढेच नाही तर ती बॅट हातात घेऊन ती फटकारे लगावत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत. तसेच हा व्हिडिओ वेगाने शेअर होताना दिसत आहे. मितालीचा साडीमधील क्रिकेट खेळतानाचा लूक पाहून तिच्या चाहत्यांनी देखील तिचे कौतूक केले आहे.

मिताली राजने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन दिले की ‘तुम्हाला प्रत्येक साडी बरंच काही सांगते. साडी कधी तुम्हाला फिट राहायला सांगत नाही. चला येणाऱ्या महिला दिनी एक अनमोल गोष्ट सुरु करुया. यंदाच्या महिला दिनी आपल्या तत्वानुसार जगण्यास सुरुवात करुयात.’

तिने यातून सांगितले की, आता जगाला देखील दाखवून द्या की आम्ही सुद्धा हे करु शकतो. या व्हिडिओच्या अखेरीस तिने महिला दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

मितालीचा हा व्हिडिओ यूजर्सने सोशल मीडियावर अनेकदा शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिचे चाहते देखील या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

मिताली राजने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा मोठा डोंगर रचला आहे. ती अशी एकटी महिला आहे जिची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 20 वर्षांपेक्षा जास्त आहे. तिने टी – 20 फॉर्मेटमधून 2019 मध्ये निवृत्ती घेतली आहे आणि तिने स्वत:ला वन डे मालिकेसाठी झोकून दिले आहे. 2015 मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.