मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारी पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघामध्ये सध्या वन डे मालिका सुरू आहे. आज या मालिकेतला तिसरा सामना लखनऊ येथे सुरू आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Mithali Raj becomes first Indian woman to score 10,000 international runs
Read @ANI Story | https://t.co/1Z4UfzxH28 pic.twitter.com/4Q7DLsoXjp
— ANI Digital (@ani_digital) March 12, 2021
What a champion cricketer! 👏👏
First Indian woman batter to score 10K international runs. 🔝 👍
Take a bow, @M_Raj03! 🙌🙌@Paytm #INDWvSAW #TeamIndia pic.twitter.com/6qWvYOY9gC
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2021
आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या १२ षटकांत २ बाद ६४ धावा केल्या होत्या. यानंतर कर्णधार मिताली राज हिने फलंदाजीला येत ३६ धावा काढल्या. या खेळीमध्ये तिने ५ चौकार मारले आहेत. या छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळीनंतर तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील १० हजार धावांचा टप्पा पार केला. तिने आतापर्यंत वन डे क्रिकेटमध्ये २१२ सामने खेळताना ५०.६४ च्या सरासरीने ६९७४ धावा केल्या आहेत, तर ८९ टी २० सामन्यात २३६४ धावा आणि १० कसोटी सामन्यात ६६३ धावा केल्या आहेत. अशा प्रकारे तिने एकूण १० हजार १ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा आकडा गाठणारी मिताली जगातील दुसरी आणि भारतातील पहिलीच महिला क्रिकेटपटूचा मान तिने पटकावला आहे. यामध्ये तिने सुझी बेट्स आणि स्टिफनी टेलर यांना मागे टाकले आहे. यामध्ये इंग्लंडची फलंदाज चार्लोट एडवर्ड्स १०२७३ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडची क्रिकेटपटू सुझी बेट्स ७८४९ धावांसह तिसऱ्या स्थानी, तर वेस्ट इंडीजची क्रिकेटपटू स्टेफनी टेलर ७८१६ धावांसह चौथ्या स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडची फलंदाज चार्लोट एडवर्ड्स ही मितालीपेक्षा फक्त २७२ धावांनी पुढे आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटू
१) चार्लोट एडवर्ड्स : १०२७३ धावा ( इंग्लंड)
२) मिताली राज : १०००१ धावा ( भारत)
३) सुझी बेट्स : ७८४९ धावा ( न्यूझीलंड)
४) स्टेफनी टेलर : ७८१६ धावा (वेस्ट इंडीज)