पाकिस्तानमधील ते शहर जिथं मुस्लिमांपेक्षा जास्त राहतात हिंदू, कधीही होत नाही कोणती ‘हिंसा’ !

नवी दिल्ली : इस्लामिक देश पाकिस्तानमध्ये हिंदू-मुस्लिमांनी एकत्र प्रेमाने राहाणे कुणालाही आश्चर्य वाटण्यासारख्या आहे. येथे अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मपरिवर्तनाच्या बातम्या नेहमीच मीडियामध्ये झळकत असतात, परंतु येथे एक असे शहरसुद्धा आहे, जेथून अशाप्रकारच्या बातम्या कधीही येत नाहीत. तुम्ही ऐकून हैराण व्हाल की, या शहरात मुस्लिमांपेक्षा जास्त लोकसंख्या हिंदूंची आहे.

या शहराचे नाव मीठी आहे, हे शहर थारपारकर जिल्ह्यात आहे. हे शहर पाकिस्तानच्या लाहोरपासून सुमारे 875 किलोमीटर, तर भारतातील गुजरातमधील अहमदाबादपासून सुमारे 340 किलोमीटर दूर आहे. या शहरात हिंदू-मुस्लिम एकतेचा वेगळा आदर्श दिसून येतो.

मीठीची एकुण लोकसंख्या सुमारे 87 हजार आहे, ज्यामध्ये सुमारे 80 टक्के लोक हिंदू आहेत, तर पूर्ण पाकिस्तानमध्ये सुमारे 95 टक्के मुसलमान आहेत. असे म्हटले जाते की, या शहरात जेव्हा काही धार्मिक सण किंवा सांस्कृतिक आयोजन असते तेव्हा हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक मिळून मिसळून भाग घेतात.

शहरात हिंदू आणि मुस्लिम दिवाळी आणि ईद एकत्रित साजरी करतात. मीठीमध्ये हिंदू लोक मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होतात आणि अनेकदा मुस्लिमांसाबत रोजेसुद्धा ठेवतात. तर, हिंदूंच्या धर्माचा सन्मान ठेवत येथील मुस्लिम गाय कापत नाहीत. इतकेच नव्हे, ते बीफसुद्धा खात नाहीत.

या शहरात क्राइम रेट पाकिस्तानच्या इतर शहरांच्या तुलनेत एकदम कमी आहे. येथे गुन्ह्याचा दर अवघा दोन टक्के आहे आणि सर्वात विशेष म्हणजे येथे धार्मिक असहिष्णुता कधीही दिसून येत नाही.

या शहरात अनेक मंदिरे आहेत, ज्यामध्ये सर्वात प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर आहे. जेव्हा येथे मंदिरांमध्ये हिंदू पूजा करतात, तेव्हा अझानसाठी मोठ्या आवाजात स्पीकर वाजवले जात नाहीत आणि नमाजच्या वेळी मंदिरात घंटा वाजवली जात नाही.

येथील मुस्लिमांचे म्हणणे आहे की, 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात जेव्हा भारतीय लष्कर मीठीपर्यंत पोहचले होते, तेव्हा मुस्लिमांना रात्रीतून येथून पळून जावे लागले होते. मात्र, नंतर येथे राहणार्‍या हिंदूंनी त्यांना पुन्हा येथे राहण्यासाठी समजूत घातली, आणि त्यानंतर पुन्हा ते लोक येथे राहण्यासाठी आले.