अभिनेत्री मिथिला पालकरनं शेअर केला ‘सुपरहॉट’ फोटो, काही तासातच मिळाले 4 लाख Likes

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री मिथिला पालकर ही मराठी आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आज इंडस्ट्रीत तिची वेगळी जागा आहे. आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळे मिथिला नेहमीच चाहत्यांच्या नजरेत येत असते. आपली स्माईल आणि अदांनी चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी मिथिला सोडत नाही. मिथिला सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

आपल्या बोल्ड ड्रेस आणि हॉट अंदाजामुळं मिथिलानं अनेकदा अटेंशन घेतलं आहे. चाहत्यांना मिथिलाच्या हटके फोटोंनी नेहमीच भुरळ पडत असते. आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी मिथिला ओळखली जाते. मिथिलाचे अनेक स्टनिंग आणि ग्लॅमरस फोटो याआधीही सोशलवर व्हायरल झाले आहेत. सध्या तिचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात मिथिलाचा सुपरहॉट अंदाज पहायला मिळत आहे. मिथिलाचे हे फोटो सोशलवर चर्चेत आहेत.

यातील एका फोटोत मिथिला ब्लॅक मोनोकनीत दिसत आहे. या फोटोत मिथिला कमालीची बोल्ड आणि हॉट दितत आहे. चाहत्यांनाही तिचा हा फोटो प्रचंड आवडला आहे. काही तासांतच या फोटोला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मिथिलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं कारवां या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. या सिनेमात ती अभिनेता इरफान खानसोबत दिसली होती. मुरांबा या मराठी सिनेमातून तिनं चाहत्यांना भुरळ घातली होती. नेटफ्लिक्सवरील चॉपस्टिक या सिनेमातही मिथिलानं अभय देओल सोबत काम केलं आहे.