‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा डिस्को डान्सर अभिनेता मिथून चक्रवर्तीने १९७९ मध्ये अभिनेत्री योगिता बालीसोबत लग्न केले. मिथूनच्या आधी योगिताचे लग्न किशोर कुमारसोबत झाले होते. योगिता किशोर कुमारची तिसरी पत्नी होती. योगिता आणि मिथूनच्या लग्नानंतर किशोर कुमार नाराज झाले होते. याचा परिणाम असा झाला की, किशोर कुमारने मिथून चक्रवर्तीमुळे गाणे म्हणणे सोडले होते.

मिथून चक्रवर्ती आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या दरम्यान नक्शलवाद्यांशी जोडले गेले होते. पण आपल्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांनी नक्शलवादाचा मार्ग सोडला. व चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे.

‘मृगया’ सारखे सुपरहिट चित्रपटमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारा मिथून हा चित्रपट केल्यानंतर अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये होता. मिथूनसाठी ती परिस्थिती खूप वाईट होती. अभिनय करताना कामाचा विश्वास सगळे देतात. पण कोणी काम देत नव्हते. ही गोष्ट त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती.

मिथून चक्रवर्ती आजही आपल्या डान्सला पहिले प्रेम मानतात. त्यांच्यासाठी डान्स करणे एका पुजा करण्यासारखे होते. वयामुळे मिथून नेहमी पडद्याआड राहिले. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये डान्सला नवीन ओळख दिली आहे. एक वेळ अशी होती तेव्हा मिथूनच्या डान्समुळे चित्रपट सुपरहिट होत होता. नुकताच मिथून यांचा ‘दी ताशकंद फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्यूमागचे कारण शोधण्याच्या आधारावर आहे.

८० च्या दशकात मिथूनच चालत होते. त्यावेळी अमिताभ बच्चनही प्रसिद्ध कलाकार होते. मिथून यांनी ‘मेरा रक्षक’, ‘सुरक्षा’, ‘तराना’, ‘हम पांच’, ‘डिस्को डांसर’, ‘प्यार झुकता नहीं’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. डान्समुळे मिथून यांना स्वतःची ओळख मिळाली. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग वाढला.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’