×
Homeताज्या बातम्याMithun Chakraborty | ...म्हणून मिथुन चक्रवर्ती बप्पीदा यांच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत

Mithun Chakraborty | …म्हणून मिथुन चक्रवर्ती बप्पीदा यांच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या डिस्को संगीतानं (Disco Music) अनेक पिढ्यांना वेड लावणाऱ्या बप्पी लहरी (Bappi Lahari) यांचे मुंबईत निधन झाले. बप्पीदा यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण बॉलिवूडसह (Bollywood) त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. बप्पीदा यांनी सिनेसृष्टीला अनेक गाणी (Song) दिली. त्यामुळे त्यांचं निधन हा बॉलिवूडसाठी मोठा धक्का होता. असं असताना अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) हे बप्पीदा यांच्या अंत्यसंस्कारासाठी (Funeral) आले नाहीत. मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) न येणं प्रत्येकासाठी आश्चर्यकारक होते. त्यावर मिथुन यांनी न येण्याचं कारण सांगितलं आहे.

 

बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना ‘डान्सिंग स्टार’ (Dancing Star) म्हणून ओळखले जाते. ‘आय एम अ डिस्को डान्सर’, ‘जिम्मी जिमी जिमी आजा’, ‘याद आ रहा है’, ‘कम क्लोजर’ या सारख्या गाण्यांनी मिथुन यांच संपूर्ण करिअरच बदलून गेलं. ही सर्व गाणी मिथुनदा यांच्यासाठी बप्पी लहरी यांनी दिली होती.

 

असं असूनही बप्पी लहरी यांच्या अंत्यविधीला मिथुनदा गेले नाहीत. यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. बप्पीदा यांच्या अंत्यविधीला न जाण्याचे कारण मिथुनदा यांनी पहिल्यांदाच सांगितले आहे. ज्यावेळी बप्पी लहरी यांचे निधन झाले, तेव्हा चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) बप्पीदा यांच्या गाण्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 80 च्या दशकामध्ये बप्पी लहरी आणि मिथुन चक्रवर्ती याची गाणी खूप गाजली. त्यांची गाणी सोशल मीडियावर ट्रेंड होत होती.

मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, बप्पीदा यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी ते बंगळुरुमध्ये (Bangalore) होते.
बप्पीदा यांच्या जाण्याने त्यांना एवढा मोठा धक्का बसला की खूप दु:ख झालं.
मात्र त्यांना बप्पीदा यांची अखेरची अशी आठवण नको होती. त्यामुळे ते अंत्यसंस्काराला गेले नाहीत.

 

Web Title :- Mithun Chakraborty | mithun chakraborty shared why he did not attend bappi lahiri funeral shocking reason come out

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant | घटस्फोटानंतर राखी सावंतला करायचंय ‘या’ क्रिकेटरशी दुसरं लग्न

 

Pune NCP | राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी गिरीश गुरुनानी यांची निवड

 

K Chandrashekar Rao | तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आणि CM उद्धव ठाकरे यांच्यात ‘चाय पे चर्चा’, भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीचे संकेत

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News