गंभीर आजाराने त्रस्त आहेत…मिथून चक्रवर्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे सुप्रसिद्ध डिस्को डान्सर मिथून चक्रवर्ती हे गंभीर आजाराला तोंड देत आहे. काही दिवसांपूूर्वी ते ‘द ताशकंद फाइल्स’ च्या प्रमोशन मध्ये व्यस्त होते. हा चित्रपट देशाचे माजी प्रधानमंत्री लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या मृत्यू वर बनवला आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. एका रिपोर्ट नुसार केरळ मध्ये मिथुन यांच्यावर उपचार सुरु आहे.

मिथून चक्रवर्ती हे खुप दिवस झाले पाठीच्या त्रासाने त्रस्त होते. या कारणाने केरळ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ही माहिती मिथून यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती यांनी दिली, नमाशी म्हणाला, जेव्हा माझे वडील लॉस एंजिलिसला जात होते. तेव्हा लोकांना कळाले ते आजारी आहेत. त्यावेळी ते पाठीसाठी उपचार घेत आहे. त्यांचा ‘द ताशकंद फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी मुंबई मध्ये येतील. त्यांचा ९० टक्के पाठीचा त्रास कमी झाला आहे. लवकरच ते मुंबईत येतील. ते पुन्हा येण्याच्या प्रतिक्षेत आहे.

त्यांचा आगामी चित्रपट ‘द ताशकंद फाइल्स’ हा खुप चर्चेत आहे. या चित्रपटाचे निर्देशन विवेक अग्निहोत्री करत आहे. यामध्ये मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत अभिनेते नसीरुद्दीन शाह, श्वेता बसु प्रसाद, पल्लवी जोशी, पंकज त्रिपाठी यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.