या आजाराने त्रस्त आहेत डिस्को डान्सर मिथुन चक्रबर्ती

दिल्लीः वृत्तसंस्था
लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रबर्ती गेल्या बरेच दिवसांपासून आजारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मिथुन यांच्यावर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरू असून 65 वर्षीय मिथुन यांना गेल्या वर्षीपासून ‘हाइबरनेशन’ नावाच्या आजाराने ट्रस्ट आहेत. तसेच त्यांना पाठीचे दुखणे देखील आहे.

डीएनएच्या रिपोर्टनुसार पाठीच्या दुखण्यावर उपचारासाठी ते अमेरिकेला गेले होते. त्यानंतर ते काही दिवस आपल्या उटीमधल्या घरी रहायला गेले. त्यानंतर काही कालावधीसाठी ते छोट्या पडद्यावर परतले होते. त्यानंतर मिथुनदा आयुष्यमान खुरानाच्या ‘हवाईजादा’ चित्रपटात दिसले होते.

मिथुनदा यांच्या पाठीच्या दुखण्या मागचे कारण त्यांनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान केलेला स्टंट असल्याचे बोलले जात आहे. साधारण 2009 मध्ये इमरान खान आणि संजय दत्त यांच्या ‘लकी’ चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान मिथुनदा यांनी स्टंट केला होता. या स्टंटसाठी त्यांना चॉपर मधून उडी मारायची होती. मात्र त्यांचे टायमिंग चुकले आणि ते खाली पडले. हा स्टंट करताना त्यांना दुखापत झाली. मिथुनदादा ‘रिअॅलिटी शो’ ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसले होते.

दादा राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत दिसू शकतात. याशिवाय ते विवेक अग्निहोत्रीचा ‘द ताशकंद’ फाइल्सचा सुद्धा भाग आहेत. यात त्यांच्यासोबत नसीरुद्दीन शहापण दिसणार आहेत. हा एका पीरियड-थ्रिलर चित्रपट आहे.

मिथुनदा यांचे प्रचंड चाहते आहेत. त्यांच्या उमेदीच्या काळातील चित्रपट खास करुन छोट्या शहरांमध्ये विशेष लोकप्रिय होयचे. त्यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक दिवस तिकिट खिडक्यांवर हाऊसफुलचा बोर्ड असायचा.