मिथुन चक्रवर्तीची मुलगी ‘दिशानी’चा स्टायलिश अंदाज, ‘या’ सिनेमांमध्ये केलाय अभिनय

पोलीसनामा ऑनलाईन : करण जोहरने नुकताच संजय कपूर आणि महेप कपूरची मुलगी शनाया कपूरला बॉलिवूडमध्ये लाँच केले. शनायाचा डेब्यू चित्रपट जुलैमध्ये सुरू होईल. मात्र, या घोषणेनंतर करण आणि शनाया सोशल मीडियावर बरेच ट्रोल झाले होते. यावर्षी सुनील शेट्टीचा मुलगा अहानसुद्धा ‘तडप’ मधून बॉलिवूड इनिंगची सुरूवात करीत आहे.

बॉलिवूडमधील आणखी एक स्टार डॉटर आपल्या डेब्यूच्या तयारीत आहे. ती म्हणजे हिंदी सिनेमाचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती. दिशानी सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते आणि बर्‍याचदा तिचे स्टायलिश फोटोही पोस्ट करते. तिच्या डेब्यूबद्दल चर्चा सुरू आहे, पण अद्याप निश्चित नाही.

मिथुनला तीन मुले आणि एक मुलगी आहे. मुलगा महाक्षय चक्रवर्तीने (मिमोह) काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु त्यांना यश मिळालं नाही. त्याचवेळी लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती बॅड बॉईज चित्रपटापासून त्याच्या डेब्यूची वाट पाहत आहे. हा चित्रपट रिलीज होण्याच्या तयारीत आहे. तिसरा मुलगा उष्मी चक्रवर्ती यांना चित्रपट निर्मितीमध्ये रस आहे. या सर्वांची लाडकी म्हणजे दिशानी.

मीडिया रिपोर्टनुसार, मिथून आणि योगिता बाली यांनी 90 च्या दशकात दिशानीला दत्तक घेतले होते. दिशानीने न्यूयॉर्क अ‍ॅकॅडमीमध्ये अभिनयाचा अभ्यास केला. दिशानीला अद्याप चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी आली नाही, परंतु तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 2017 मध्ये दिशानीने भाऊ उष्मीच्या ‘होली स्मोक’ या लघुपटात काम केले. या इंग्रजी भाषेच्या चित्रपटात दिशानीने मानसिक आजार असलेल्या मुलीची भुमिका साकारली होती. या चित्रपटात महाक्षय आणि नमाशी यांनीही भूमिका साकारल्या. याशिवाय दिशानीने अंडरपास आणि सबटल एशियन डेटिंग या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे.

दिशानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर तिचे जवळपास 80 हजार फॉलोअर्स आहेत. बर्‍याच चित्रांमध्ये दिशानी खूपच स्टाइलिश दिसत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते मिथुन सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत चर्चेत आहेत. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि निवडणुकीत ते पक्षासाठी प्रचार करतील.