मिथुनचे वडिल बसंत कुमार यांचं 95 व्या वर्षी मुंबईत निधन ! ‘लॉकडाऊन’मुळं अभिनेता बंगळुरूमध्ये अडकला

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्तीचे वडिल बसंत कुमार यांचं 95 व्या वर्षी निधन झालं आहे. दीर्घकाळापासून ते आजारी होते. बसंत कुमार यांनी मंगळवारी(दि 21 एप्रिल) जगाचा निरोप घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बसंत कुमार यांचं निधन किडीन फेलियरमुळं झालं आहे. अशीही चर्चा आहे की, मिथुन चक्रवर्ती सध्या बंगळुरूमध्ये अडकले आहेत. मुंबईला जाण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत असंही सांगितलं जात आहे. त्यांचा मोठा मुलगा मिमोह सध्या मुंबईतच आहे.

एका रिपोर्टनुसार, मिथुन शुटींगसाठी बंगळुरूला गेले होते आणि आता देशव्यापी लॉकडाऊनमुळं तिकडंच अडकले आहेत. लॉकडाऊन असल्यानं प्रवासाच्या सर्व सुविधा बंद आहेत. बसंत कुमार यांच्या मृत्यूनंतर आता अनेक सेलिब्रिटी सोशलवरून त्यांना श्रद्धांजली देत आहेत.

मिथुन यांच्या कुटुंबाचा बंगालशी संबंध आहे. त्यांचे पिता बंसत कुमार कलकत्ता टेलीफोन्समध्ये काम करत होते. त्यांना चार मुलं होती. मिथुन व्यक्तिरीक्त त्यांना 3 मुली आहेत. बंगालमध्ये होणाऱ्या हिंसेपासून वाचण्यासाठी बसंत कुमार यांनी मिथुन यांना मुंबईवला पाठवलं होतं. यानंतर मिथुन यांनी अॅक्टर होण्याचं ठरवलं. त्यांचे वडिल प्रत्येक निर्णयात त्यांच्या सोबत होते.