दारू पिवून डोक्यात दगड घातल्याने मित्राचा गेला जीव

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

वाघोली येथील आव्हाळवाडी रस्त्यावरील एका वाईन शॉपच्या समोरील मोकळया जागेत दारू पिलेल्या दोन मित्रामध्ये भांडण झाले. या भांडणात एका मित्राने मित्राच्याच डोक्यात दगड घातल्याने जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

पोपट शिवराम गायकवाड (वय 42 ) असे मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. तर आयुब अब्दुल कईम युसूफ अन्सारे हा आरोपी आहे. आरपीला अटक केली असून खुनाचा गुन्हा दखल करण्यात येणार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , सोमवारी दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आव्हाळवाडी रस्त्यावरील एका वाईन शॉपच्या समोरील मोकळ्या जागेत घटना घडली. आरोपी आयुब अब्दुल कईम युसूफ अन्सारे याने पोपट गायकवाड याच्या डोक्यात दगड घातल्याने गायकवाड याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी आयुब अन्सारे याला तात्काळ अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली आहे.