क्रीडाताज्या बातम्यापुणे

MIvsKKR | मुंबईचा ‘सूर्य’ तळपला ! पहिल्याच सामन्यात ठोकलं अर्धशतक, KKR ला ‘इतक्या’ धावांंचं आव्हान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MIvsKKR | सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहणाऱ्या मुंबई इंडिअन्सचा (Mumbai Indians) आज कोलकाताविरूद्ध सामना चालू आहे. सुर्यकुमार यादव आणि पोलार्डने केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर या मुंबईने कोलकाताला 162 धावांचं लक्ष्य दिलं आहे. (MIvsKKR)

 

नाणेफेक जिंकत कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या मुंबई संघाची सुरूवात निराशाजनक झाली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) उमेश यादवला (Umesh Yadav) अवघ्या 3 धावांवर माघारी धाडलं. फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशनलाही (Ishan Kishan) फार काही चमक दाखवता आली नाही. छोटा डिव्हिलिअर्स म्हणून ओळख ओळखला जाणाऱ्या ब्रेविसने छोटेखानी आक्रमक खेळी केली, त्याला चक्रवर्तीने शिकार बनवलं. त्यावनंतर सुर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने संयमी खेळी केली. (MIvsKKR)

 

सुर्यकुमारने (Suryakumar Yadav) 52 धावांची सुरेख खेळी केली आणि मुंबईला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. सुर्याने पाच चौकार आणि दोन षटकार खेचले. त्याच्यासोबत मागील सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी करणाऱ्या तिलक वर्माने (Tilak Varma) 38 धावांची खेळी केली.

 

दरम्यान, कोलकाताकडून पँन्ट कमिन्सने (Pat Cummins) दोन, उमेश यादव आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
अखेरच्या षटकात पँन्ट कमिन्सने सुर्याला बाद केल्यावर फलंदाजीला आलेल्या पोलार्डनेही (Kieron Pollard) अखेरच्या षटकात 23 धावा काढल्या.
यामध्ये तीन षटकारांचा समावेश आहे.

 

Web Title :- MIvsKKR | Mumbai Indians Suryakumar Yadav score51

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Praniti Shinde On PM Modi | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाल्या…

 

Mrunal Thakur Oops Moment | फॅशनच्या नादात मृणाल ठाकूर झाली Oops Moment ची शिकार, इंटरनेटवर व्हिडिओ झाला व्हायरल..

 

Deepika Padukone Airport Look | एअरपोर्टवर अशा कपड्यात दिसली दीपिका पादुकोन, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

Back to top button