मेहंदीमध्ये ‘या’ 4 गोष्टी मिक्स करून लावा केसांना, दीर्घकाळ राहतील काळेभोर केस

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या पांढऱ्या केसांच्या समस्येने अनेकजण हैराण आहेत. साधारणतः पांढऱ्या केसांची समस्या वाढत्या वयात पाहायला मिळते. मात्र, अलीकडे अनेक
तरुणांचेही केस पांढरे झाल्याचं पाहायला मिळतं. कमी वयातच केसाचं पांढरे होण्यामागे धावपळीची जीवनशैली, दिवसभराचा तणाव, चुकीचा आहार या गोष्टी कारण ठरतात. अनेकदा पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदीचा वापर केला जातो.

पण योग्य पद्धत माहिती नसल्याने त्याचा केसांना संपूर्ण फायदा होत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही अशा पद्धती बद्दल सांगणार आहोत. ज्याच्या वापराने मेहंदी केसांना लावली तर अनेक फायदे होतात. तसेच म्हातारपणी केस पांढरे होणार नाही.

मेहंदी भिजवण्यासाठी पाणी तयार करण्याची पद्धत…

साहित्य :

१. एक ग्लास पाणी
२. मेथीच्या दाण्यांची पावडर
३. एक चमचा कॉफी पावडर
४. एक चमचा लवंगाची पावडर

कसे कराल तयार

मेहंदी भिजवण्याकरता एका ग्लास पाण्यात मेथीच्या दाण्याची पावडर आणि कॉफी पावडर एकत्र करुन २ ते ३ मिनिटांसाठी गॅसवर उकळत ठेवा. नंतर त्यात लवंगाची पावडर एकत्र करुन ३ मिनिटांसाठी पुन्हा उकळून घ्या. तयार झालेलं मिश्रण गॅस बंद करुन बाजूला ठेवा. मेथीच्या दाण्यांची पावडर केसांना नॅचरली मजबूत आणि काळे करण्यासाठी मदत करते. तर कॉफी पावडर मेहंदीचा रंग डार्क करण्यासाठी मदत करतो. तसेच लवंगाची पावडर केसांना मुळापासून मजबुत करते.

जाणून घेऊया केसांसाठी मेहंदी तयार करण्याची पद्धत…

साहित्य :

१. मेहंदी 100 ग्रॅम
२. जास्वंदाची पावडर
३. आवळ्याची पावडर
४. शिकेखाई पावडर
५. कॉफी पावडर एक चमचा

कसे करणार तयार?

मेहंदी तयार भिजवण्यासाठी एक लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तवा घ्या. त्यामध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करा. लक्षात ठेवा की, मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडाची कढई किंवा लोखंडाच्या भांड्याचा वापर करा. या भांड्यांमध्ये मेहंदी व्यवस्थित ऑक्सिडाइट होण्यास मदत होते. आता यामध्ये तयार पाणी एकत्र करा आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा.

असा करा वापर

१. सर्वात प्रथम केसांना एखाद्या माइल्ड शॅम्पूने धुवून घ्या, त्यामुळे केसांवरील सगळी धूळ-माती, तेलकटपणा दूर होण्यास मदत होते. लक्षात ठेवा की, जर तुम्ही केस नाही धुतले तर मेहंदीचा रंग व्यवस्थित केसांना लागणार नाही. तसेच केसांना सीरम लावत असाल तर ते देखील लावू नये.

२. आता मेहंदी केसांना अप्लाय करा आणि कमीत कमी 2 ते 3 तासांसाठी तसेच ठेवा.

३. केसांना लावलेली मेहंदी व्यवस्थित पाण्याने धुवून घ्या आणि लक्षात ठेवा की, मेहंदी लावल्यानंतर शॅम्पूचा वापर करू नका. त्याचबरोबर कोणत्याही प्रोडक्टचा वापर करणंही टाळा. कारण यामुळे कलर लाइट होऊ शकतो.

४. रात्री झोपण्यापूर्वी केसांना मोहरीचं तेल लावा. त्यामुळे मेहंदीचा रंग आणखी पक्का होण्यास मदत होते.