#Video : डांबरात ऑईल मिसळणाऱ्यांचा पर्दाफाश, गुन्हा दाखल

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन टीम (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे टँकरमधील चांगले डांबर काढून त्याजागी काळे ऑइल आणि पावडरचे मिश्रण भरण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी धाड टाकून ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून डांबर मिसळणाऱ्यांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्त्यांच्या कामासाठी टँकरमधून मागविण्यात आलेले चांगले डांबर काढून त्याजागी काळे तेल आणि पावडरचे मिश्रण भरले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.