हॉस्पिटलमध्ये स्वत: फर्शी साफ करताना दिसले कोरोना संक्रमित मंत्री, लोकांनी केले खुप ‘कौतूक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  हॉस्पिटलची फर्शी स्वच्छ करताना एका कोविड रूग्णांचे छायाचित्र सोशल मीडियावर वायरल होत आहे. पण, हा काही सामान्य फोटो नाही. यामध्ये स्वच्छता करताना दिसत असलेली व्यक्ती मिझोराम सरकारचे मंत्री आर. लालझिर्लियाना आहेत. ते कोविड संक्रमित झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. फोटो वायरल झाल्यानंतर प्रत्येकजण भारताच्या या राजकीय नेत्याचे कौतूक करत आहे. मंत्र्यानेहीc बाजूला ठेवून लोकसेवेचे कर्तव्य पार पाडले.

71 वर्षांचे लालझिर्लियाना मिझोराम सरकारमध्ये उर्जामंत्री आहेत. फोटोत दिसत आहे की, ते हॉस्पिटलमधील गणवेश घालून आणि हातात मॉप घेऊन हॉस्पिटलच्या वार्डची जमीन स्वच्छ करत आहेत. हॉस्पिटलचे नाव जोराम मेडिकल कॉलेज आहे. मंत्री अजूनही आजारापणामुळे हॉस्पिटलमध्ये आपला उपचार करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, हा फोटो वायरल झाल्यानंतर मंत्र्याने म्हटले की, त्यांचा हेतू हॉस्पिटल स्टाफला लाजवण्याचा नव्हता. लालझिर्लियाना यांनी स्थानिक मीडियाला सांगितले की, त्यांनी कर्मचार्‍याला स्वच्छतेसाठी बोलावले होते. जेव्हा कर्मचार्‍याने त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया दिली नाही, तेव्हा त्यांनी स्वताच फर्शी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावर लोकांनी केले कौतूक

त्यांनी म्हटले, झाडू, लादी स्वच्छ करणे किंवा घरची कामे करणे माझ्यासाठी नवीन नाही. मी हे काम घरी किंवा जिथे आवश्यकता असे तिथे करत होतो. त्यांनी म्हटले की, फर्शीवर मॉपींग करून नर्स किंवा डॉक्टर यांना लाजवण्याचा माझा हेतू नव्हता. उलट मी लोकांना कोणतेही काम छोटे नसते हे दाखवून दिले.

त्यांनी ही सुद्धा माहिती दिली की, दोन दिवसांपर्यंत मिनी आयसीयुमध्ये राहिल्यानंतर त्यांची प्रकृती ठिक आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट घेतली नव्हती. त्यांनी म्हटले, आम्ही येथे ठिक आहोत. मेडिकल स्टाफ आणि नर्स आमची चांगली देखभाल करत आहेत. स्थानिक रिपोर्टनुसार मंत्री त्यांची पत्नी आणि मुलगा अगोदर होम आयसोलेशनमध्ये होते, परंतु 12 मेराजी ऑक्सीजन स्तर कमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.