#MeToo : अकबर यांची खासदारकीही जाणार ?

भोपाळ : वृत्तसंस्था – तब्बल २० महिलांनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना आता राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागणार आहे, अशी जोरदार चर्चा आहे. अकबर यांनी राज्यसभा सदस्यत्व सोडावं, अशी मध्य प्रदेशातील काही भाजप नेत्यांची इच्छा आहे, अशी माहिती समोर आली आहे.
अकबर हे मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. २८ नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप नेते कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. अकबर यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, यासाठी हे नेते दबाव आणत आहेत. त्याबाबत ते लवकरच पक्ष नेतृत्वालाही सांगणार आहेत, असं समजतं.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c174513-d29f-11e8-979d-c1634426be74′]
 #MeToo आणि अकबर –
अकबर नायजेरियात असताना भारतात मी टूचं वाद सुरु झाला.  एम. जे. अकबर पत्रकारितेत असताना त्यांनी नवोदित महिला पत्रकारांची लैंगिक छळवणूक केल्याचे आरोप झाले. प्रिया रमाणी या पत्रकारानं धाडस दाखवत एशियन एजचे संपादक असताना अकबर यांनी केलेल्या छळाची  माहिती ट्विटरवर दिलीआणि अनेक महिलांनी पुढे येत अकबर यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, अकबर विदेशातून परत आले आणि त्यांनी सगळे आरोप फेटाळत मानहानीचा दावा केला. मात्र, रमाणी यांच्या मागे तब्बल १९ महिला उभ्या राहिल्या. याच दरम्यान, मोदी सरकारनं अशा लैंगिक छळ करणाऱ्या अतिरेक्यांना पाठिशी का घालावं असा सवाल करत काँग्रेससह विरोधकांनी भाजपाची कोंडी केली. परिणामी आधी ताठ भूमिका घेणाऱ्या अकबरना राजीनामा देणे भाग पडले आहे.
तसेच आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून केवळ आपल्याला बदनाम करण्यासाठी ते करण्यात आल्याची प्रतिक्रिया अकबर यांनी यापूर्वी दिलेली आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2cbf7da0-d29f-11e8-badd-85100f77c0ce’]
कुणी-कुणी लावले आरोप ? 
६७ वर्षीय एम. जे. अकबर हे ‘एशियन एज’ या इंग्रजी वृत्तपत्राचे माजी संपादक आहेत. रमाणी यांच्या आरोपांनंतर हळूहळू आणखी ११ पत्रकार महिलांनी अकबर यांच्याविरोधात आरोप केले. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्यासोबत काम केले होते. अकबर यांच्याविरोधात पुढे आलेल्या पत्रकारांमध्ये फोर्स मॅगझिनच्या कार्यकारी संपादक गजाला वहाब, अमेरिकी पत्रकार मजली डे पय कँप आणि इंग्लंडच्या पत्रकार रूथ डेव्हिड शामिल यांचा समावेश आहे.
पत्रकार अकबर यांचा प्रवास –
दैनिक ‘द टेलिग्राफ’ आणि ‘संडे’ नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिलेले एम. जे. अकबर १९८९ मध्ये राजकारणात आले. तत्पूर्वी अकबर यांचे पत्रकारितेत मोठे नाव झाले होते. त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदारही झाले. पुढे अकबर यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला. मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेलेले एम. जे. अकबर जुलै २०१६मध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री झाले.
[amazon_link asins=’B07HQJJPLK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a279bf13-d2a3-11e8-afc6-270f2b45e644′]