MLA Aaditya Thackeray | ‘…तर मी आज वरळी विधानसभेचा राजीनामा देतो’, आदित्य ठाकरेंचे सुधीर मुनगंटीवारांना आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल करताना शिंदेंना चॅलेंज दिले आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आधी वरळीमध्ये निवडणुका (Worli Elections) होऊ द्या, मग समजेल कोणाचा पोपट मेला आहे, असं मुनगंटीवार म्हणाले होते. यावर बोलताना आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) म्हणाले, मुनगंटीवार हे जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर निवडणुकीसाठी उभा करणार असतील तर मी आज राजीनामा (Resignation) देतो, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुनगंटीवार यांना दिले.

आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) म्हणाले, ठिक आहे, ते (भाजप) जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करत असतील तर आत्ता राजीनामा देतो. चला, माझी तयारी आहे, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मुळात मुनगंटीवार यांचंही कोण या सरकारमध्ये ऐकत नाही अशी परिस्थिती आहे.

सध्या राज्यात सुरु असलेल्या दंगलीवरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदे, भाजप सरकारवर निशाणा साधला.
राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता असताना कुठेही अशा जातीय दंगली घडल्या नाहीत.
पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आता असं राज्यात होत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी दोन हजारांच्या (2000 Rupees Note) नोटबंदीवरुन (Demonetisation)
भाजपवर निशाणा साधला. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होईल याचा अभ्यास करणं आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Karnataka CM Siddaramaiah) यांचा शपथविधी
(Oath Ceremony) झाला. या सोहळ्यासाठी काँग्रेसकडून (Congress) उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते.
मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या सोहळ्याला गेले नाहीत. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,
उद्धव ठाकरे हे आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे सोहळ्याला गेले नाहीत. परंतु आम्ही शुभेच्छा पाठवल्या आहेत.

Web Title : MLA Aaditya Thackeray | aditya thackeray strongly criticizes shinde fadnavis government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Online Free Ration Card | सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशन कार्डसाठी एजंटला पैसे द्यावे लागणार नाहीत; घरबसल्या मोफत मिळवा रेशन कार्ड, जणून घ्या प्रोसेस

Pune NCP Protest News | पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रिजर्व बॅंक ऑफ इंडियाच्या बाहेर 2 हजार रुपयांच्या नोटांना श्रद्धांजली (Video)