माझ्या राजीनाम्याच्या ‘पुड्या’ सोडल्या, अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. खातेवाटप अजूनही झाले नाही त्याच आधी अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. परंतु दिवसभराच्या चर्चेनंतर आता अब्दुल सत्तार यांनी स्वत: माध्यमासमोर येत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. आपल्या राजीनाम्याचा पुड्या सोडल्या गेला असे त्यांनी स्पष्ट केले.

राजीनामा नाट्यावर अब्दुल सत्तार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन उत्तर देईल. माझी भूमिका मी त्यांच्यासमोर मांडेल त्यानंतर ते जे काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल. मी वेळ आल्यावर सर्व उत्तरं देईन. ज्यांनी तुम्हाला सांगितलं की मी राजीनामा दिला त्यांना तुम्ही विचारा की मी राजीनामा दिला का ?

माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या. ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना तुम्ही विचारा?  खैरेंबद्दल देखील मी उद्धव ठाकरेंशी चर्चा करेल, त्यानंतर मी बोलेल. माझा कंट्रोल मातोश्रीवर आहे, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलून माझी भूमिका सांगेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/