MLA Abdul Sattar On Sanjay Raut | ‘बंडखोरीसाठी 50 कोटी घेतले’ ! शिवसेनेच्या नेत्याकडून करण्यात आलेल्या आरोपावर अब्दुल सत्तारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  MLA Abdul Sattar On Sanjay Raut | बंडखोरी करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडण्यासाठी सर्व बंडखोर आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रूपये देण्यात आले, असा आरोप सातत्याने बंडखोरांवर केला जात आहे. शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) सुद्धा हा आरोप करत आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुद्धा बंडखोर आमदारांना याबाबत सुनावले होते. यावर आता बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते औरंगाबाद (Aurangabad News) येथे पत्रकारांशी बोलत होते. (MLA Abdul Sattar On Sanjay Raut)

 

50 कोटी घेतल्या आरोपाला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी सवाल केला की, संजय राऊत यांनी त्यांना मतदान करावे, म्हणून आम्हाला किती कोटी दिले? हे आई-बापाची शपथ घेऊन सांगावे.

 

राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात कोणते मंत्रिपद मिळणार याबाबत पत्रकारांनी विचारले असता सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्लीला गेले होते. शिंदे गटाच्या वाट्याला किती राज्यमंत्री पदे आणि कॅबिनेट मंत्रीपदे येतात, हे पहावे लागेल. त्यानुसार वाटाघाटी आणि पुढील रुपरेषा ठरवली जाऊ शकते. आपल्याला कोणतेच पद नको, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असावेत, एवढीच अपेक्षा आहे.

सत्तार पुढे म्हणाले, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे पद हे कार्यकर्ता आहे. मला फक्त कार्य करायचे आहे.
राजकारणात पदे येतात आणि जातात. पण मला माझ्या मतदारसंघासाठी काम करायचे आहे.
शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये, यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर चार दिवसांत मला जेवढा निधी मिळाला;
तेवढा निधी मी माझ्या राजकीय कारकीर्दीत कधीही पाहिला नाही.

 

Web Title :- each mla took rs 50 crore for mutiny mla abdul sattar respond over
shivsena leader and mp sanjay raut allegation aurangabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा