अर्जून खोतकरांबद्दल कॉंग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांचा मोठा गौप्यस्फोट

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – खोतकरांबद्दल दोन दिवसात गुड न्यूज मिळेल असा गौप्यस्फोट सिल्लोडचे आमदार व कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार आणि अर्जून खोतकर यांच्यात औरंगाबादमध्ये गुप्त बैठक झाली. परंतु आम्ही मित्र आहोत. कधीही भेट घेऊ शकतो असे स्पष्टीकरण खोतकर यांनी दिले आहे.

सिल्लोडचे आमदार व कॉंग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांच्यासोबत खोतकर यांनी आज औरंगाबाद येथे तासभर चर्चा केली. या चर्चेनंतर खोतकर हे माझे परममित्र आहेत. ते आता नाशिकला जात आहेत. तेथून आल्यावर ते आपल्या परीवाराशी चर्चा करतील. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांच्याबद्दल दोन दिवसात गुड न्यूज आपल्याला कळेलच. असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. तर आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. आम्ही निवडणूकीच्या दिवशीही एकमेकांना भेटू शकतो. त्यामुळे आमच्या भेटण्याला कोणाचेही बंधन नाही. अशी प्रतिक्रीया खोतकर यांनी दिली.

अर्जून खोतकर जालना येथून लोकसभेसाठी उत्सूक आहेत. मात्र भाजपने रावसाहेब दानवेंची उमेदवारी जालन्यात जाहीर केली. युती जरी असली तरी शिवसेना प्रमुखांनी मला या संदर्भात काहीही सांगितलेले नाही. मी अद्याप तरी मैदानातच आहे. असे वक्तव्य केले होते. दानवे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनीही अर्जून खोतकर यांना दानवेंविरोधात दंड थोपटण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर एका कार्यकर्त्याने तर खोतकर निवडणूकीत उभे राहिले नाहीत. तर मातोश्रीवरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी एका कार्यकर्त्याने दिली.