MLA Aditi Singh | आमदार आदिती सिंह यांनी म्हणाल्या – ‘पक्षाने विचार करावा, जितिन प्रसाद सारखे मोठे नेते का सोडत आहेत काँग्रेस?’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – MLA Aditi Singh | उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला आहे. गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जाणार्‍या रायबरेलीमधील पक्षाच्या बंडखोर आमदार अदिती सिंह यांनी म्हटले की, जितिन प्रसाद यांचे पार्टी सोडून जाणे एक मोठे नुकसान आहे. आता तरी पक्षाने आत्मचिंतन केले पाहिजे की, ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितिन प्रसाद यांच्यासारखे तरूण नेते पक्ष सोडून का जात आहेत. इतकेच नव्हे, त्यांनी काँग्रेस एका कुटुंबाचा पक्ष होत चालल्याचे म्हटले.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर रायबरेलीमधून निवडून आलेल्या आदिती सिंह यांचा मोठ्या कालावधीपासून बंडखोरीकडे कल आहे. अशाही त्या काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर सातत्याने टीका करत आहेत. पक्षाने त्यांना निलंबित सुद्धा केले आहे. अदिती सिंह यांनी म्हटले की, जितिन प्रसाद आणि सिंधिया यांच्यासारखे तरुण नेते भाजपामध्ये गेल्यानंतर हे स्पष्ट झाले की, काँग्रेस एका कुटुंबाचा पक्ष होत चालला आहे.

अदिती सिंह यांनी म्हटले, काँग्रेसने विचार केला पाहिजे की अखेर वरिष्ठ नेते एका पाठोपाठ एक पक्ष का सोडून चालले आहेत. हे नेते तरूण आहेत आणि लोकांना आपल्या सोबत ठेवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. अशावेळी काँग्रेसने आत्मचिंतन केले पाहिजे. संघटनेत आणि राज्यातील चांगले-चांगले नेते आम्ही गमावत आहोत. वैयक्तिक पातळीवर मी जितिन प्रसाद यांना ओळखते ते एक चांगले नेते आहेत.

त्यांनी म्हटले की, भाजपामध्ये जितिन प्रसाद यांचे भविष्य खुप उज्ज्वल होईल. ते जिथे राहतील चांगले राहतील. जितिन प्रसाद शिकलेले आणि समजूतदार नेते आहेत. इतक्या कमी वयात त्यांनी मंत्रालय सांभाळले. यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होणार आहे.

अदिती सिंह यांनी गांधी कुटुंबाला सल्ला देत म्हटले की, आत्मचिंतन करा की, अखेर मोठे नेते पक्ष सोडून का जात आहेत.
पक्षात कुठे गडबड होत आहे. आणि लोक कोण आहेत जे पक्षाला योग्य सल्ला देत नाहीत.
त्यांनी म्हटले की, उत्तर प्रदेशच्या राजकारणात जमीनीवर काम करण्याची काँग्रेसला आवश्यकता आहे.
मात्र, अदिती सिंह यांनी म्हटले त्या राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याबाबत काहीही बोलणार नाहीत,
परंतु त्यांनी स्वता पाहिले पाहिजे की, अखेर पक्षात कोणते कारण आहे की, लोक पक्ष सोडून जात आहेत.

रायबरेली मतदार संघाच्या आमदार अदिती सिंह यांना काँग्रेसने निलंबित केले आहे.
त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेसने त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व सुद्धा समाप्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही.
अदिती ही काँग्रेसचे आमदार दिवंगत अखिलेश सिंह यांची मुलगी आहे.
2017 मध्ये आदिती सिंह काँग्रेसच्या तिकिटावर सपाच्या पाठिंब्याने निवडून विधानसभेवर पोहचल्या आहेत, परंतु 2019 च्या नंतर त्यांचा कल बंडखोरीकडे आहे.
2022 ची निवडणूक त्या भाजपाच्या तिकिटावर लढू शकतात, असा अंदाज आहे.

हे देखील वाचा

आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती, दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान (व्हिडीओ)

Nashik Election | नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 16,379 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.45% 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा