MLA Aaditya Thackeray | कॅगच्या अहवालावरुन आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा मुंबई महापालिकेच्या कॅगचा अहवाल (BMC Cag Audit-2023) आज विधिमंडळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सदर केला. या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या एकूण कारभारावर मारले आहेत. यावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांना चँलेंज दिले आहे.

आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) म्हणाले, हिंमत असेल तर नाशिक, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांची देखील कॅग चौकशी करावी. पण त्यांच्यात हिंमत नाही आणि लाजही नाही. हे सगळं राजकीय आहे. बदनामी करणे सुरु आहे. मुंबई शहर बदनाम करायचं, मुंबई महानगरपालिकेला संपवून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

कॅगच्या अहवालातील (CAG Report) मुख्य निरीक्षण

1. मुंबई महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) दोन विभागांची 20 कामे (214.8 कोटी) टेंडर न काढता दिली.

2. 4755.94 कोटींची कामे एकूण 64 कंत्राटदार आणि BMC यांच्यात करार नसल्याचे एक्झिक्युट झाली नाही. करार नसल्याने BMC ला कारवाईचा अधिकार नाही.

3. 3355.57 कोटींच्या 3 विभागांच्या 13 कामांमध्ये थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्ती नाही. त्यामुळे कामे कशी झाली हे, पाहणारी यंत्रणा नाही.

4. माहिती तंत्रज्ञान विभागात SAP implementation: 159.95 कोटींचा कंत्राट निविदा न मागविताच पूर्वीच्याच कंत्राटदाराला देण्यात आले.

5. बीएमसी ब्रिज विभागात (BMC Bridge Division) मान्यता नसताना अतिरिक्त कामे देण्यात आली.
कंत्राटदाराला बीएमसी कडून अतिरिक्त फेवर दिले गेले. तसेच निविदा अटींचे उल्लंघन करीत 27.14 कोटींचे लाभ देण्यात आले.

6. रस्ते आणि वाहतूक विभागाकडून 56 कामांचा CAG कडून अभ्यास करण्यात आला. यामध्ये 52 पैकी 51 कामे
कुठलाही सर्वे न करता निवडली गेली.

Web Title :-  MLA Aditya Thackeray | aditya thackeray says investigate functioning of nashik nagpur thane navi mumbai municipal corporations

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Anil Bhosale | शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण ! आमदार अनिल भोसलेंचा चौथ्यांदा जामीन फेटाळला

CM Eknath Shinde | ‘राहूल गांधींना ‘त्या’ जेलमध्ये ठेवलं पाहिजे अन् घाण्याला जुंपलं पाहिजे’, सावरकरांच्या विधानावरुन मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

Former MLA Harshvardhan Jadhav | ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करताच हर्षवर्धन जाधवांनी दंड थोपटले, दानवे बाप-लेकीच्या विरोधात निवडणूक लढवणार