MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अकोल्यातील पाणीपुरवठा योजनेवरील (Water Supply Scheme) स्थगिती उठवण्याच्या मागणीवरुन बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Balapur MLA Nitin Deshmukh) यांनी अकोला ते नागपूर अशी ‘जलसंघर्ष’ यात्रा काढली होती. ही यात्रा गुरुवारी नागपूर शहरात दाखल होणार होती. परंतु नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) या यात्रेला वेशीवरच रोखलं आणि देशमुख यांच्यासह अनेक कार्य़कर्त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणावरुन महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी यावरुन सरकारला लक्ष केलं आहे. तसेच हीच सैतानी साम्राज्याची सुरुवात असल्याचे अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी म्हटले.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले, तेव्हापासून लोकशाही (Democracy) संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला. याचे जिवंत उदाहरण आज बघायला मिळालं. पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केली. त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक (Arrest) केली. हीच सैतानी साम्राज्याची सुरुवात आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारने हे लक्षात ठेवावे की चार दिवस सासूचे आणि चार दिवस सूनेचे असतात. ज्या दिवशी महाविकास आघाडी सत्तेत येईल, तेव्हा हिशोब दिला जाईल, असा इशारा अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी दिला आहे.

राज्यात नेमकं चाललंय काय?

याच मुद्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी
राज्य सरकारवर (State Government) टीका केली. नितीन देशमुख पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढत होते.
त्याचा सरकारला त्रास होण्याचं कारण काय? बळापूर भागातील तीन महिन्याचं बाळही खारयुक्त पाणी पिते.
या पाण्यामुळे लोकांचे जीवन संकटात आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाण्याची
योजना मंजूर केली होती. परंतु देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर स्थगिती आणली.
नितीन देशमुख हेच खारयुक्त पाणी फडणवीसांना दाखवण्यासाठी नागपूरला जात होते. मात्र सरकारने त्यांना अडवलं.
राज्यात नेमकं चाललंय काय? हे सरकार मोगलाई परत आणतय का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

Web Title :- MLA Amol Mitkari | amol mitkari criticized shinde fadnavis government after arrest nitin deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bribe Demand Case On Mahila Talathi | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 20 हजाराच्या लाच प्रकरणी महिला तलाठीविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांनी नगरविकासासाठी रेकॉर्डब्रेक निधी दिला, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यावर ठेवलं बोट

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँच : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या 3 सट्टेबाजांना तळेगाव दाभाडेमध्ये अटक (Video)