MLA Amol Mitkari | अमोल मिटकरी ‘घासलेट चोर’, शिवा मोहोड यांचा घणाघाती आरोप; मिटकरींनी पाठवली 5 कोटीची मानहानीची नोटीस

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी शिवा मोहोड (Shiva Mohod) यांच्यासह अन्य दोघांना मानहानीची नोटीस (Notice of Defamation) बजावली आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यावर झालेले आरोप, त्यावर त्यांनी केलेला पलटवार आणि शिवा मोहोड यांनी पुन्हा मिटकरींवर (MLA Amol Mitkari) आणि पक्षातील प्रस्थापितांवर केलेल्या आरोपाने जिल्ह्यासह राष्ट्रवादीमधील (NCP) अंतर्गत कलह तिव्र होताना दिसत आहे.

 

काय म्हटले नोटीस मध्ये?
अमोल मिटकरींच्या (MLA Amol Mitkari) प्रतिष्ठेला हानी पोहोचविण्याच्या उद्देशाने एक व्हिडिओ तयार केला होता. ज्यामध्ये मोहोड यांच्याकडून मिटकरींना ‘घासलेट चोर’ असे म्हटले होते. आणि खोटे आणि बनावट असल्याचा आरोप (False Allegations) करण्यात आले होते. याशिवाय चारित्र्यावर आणि भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप, भ्रष्ट असे म्हटले होते, जे निंदनीय आहे. या आरोपींव्यतिरिक्त विविध बदनामीकारक आरोप केले आहेत. त्यामुळे मिटकरींची प्रतिष्ठा आणि स्थान मलीन केले आहे. त्यामुळे मानसिक छळ आणि यातना सहन कराव्या लागत आहेत. आणि समाजाच्या नजरेत त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे.

 

या पार्श्वभूमीवर मिटकरींवर आरोप करणारे शिवा मोहोड आणि अन्य दोघांना नोटीसद्वारे 7 दिवसांच्या आत लेखी माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. नोटीसीची पावती आणि पाच कोटीची नुकसान भरपाई देखील केली आहे. माफी न मागितल्यास कायदेशीर कार्यवाही (Legal Proceedings) सुरु करण्यात येईल आणि सर्वांवर आयपीसी 499, 500, 501 अंतर्गत खटला चालवला जाईल, असा इशारा दिला आहे. त्यांची बदनामी केल्याप्रकरणी या कायदेशीर सूचनेसाठी दहा हजार शुल्क भरण्यास देखील जबाबदार आहेत, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे.

मै झुकेगा नहीं
आमदार साहेबांनी नोटीस पाठवली आहे. पाच कोटीची नोटीस आहे. पाच कोटी यांनी वर्षभरात कमावले. पण माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील मुलाला पाच कोटीची किंमत माहिती आहे. घाम जेव्हा गाळतो न, तेव्हा पाच कोटी रुपये मिळवले जातात. चापलुसी करुन पैसे कमावणे हे सोपे आहे, म्हणून पाच कोटीची नोटीस पाठवली आहे. पक्षांतर्गत बोलल्यामुळे नोटीस पाठवली आहे की जे पत्रकार परिषद घेणार आहे,
त्यामुळे नोटीस बजावली? असा सवालही मोहोड यांनी केला आहे. या नोटीसीला उत्तर देईल.
परंतु अशा नोटीस कितीही पाठवल्या तरी घाबरणार नाही.
‘जे’ सत्य आहे ते जनतेसमोर मीडियातून मांडणं बंद करणार नाही. येणाऱ्या काळात ‘जो’ दिवस ठरला आहे,
त्या दिवशी मिटकरी यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेईल म्हणजे घेईन.
‘मै झुकेगा नहीं’, असा डायलॉग म्हणत मोहोड यांनी मिटकरींना पुन्हा इशारा दिला आहे.

 

Web Title :- MLA Amol Mitkari | ncp amol mitkari issued notice of defamation to ncp yuvak congress leader shiva mohod

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PPF खातेधारकांसाठी भारतीय पोस्ट देत आहे मोठी सुविधा, घरबसल्या करू शकता हे काम

 

Aurangabad Crime | ‘बायकोला सोड अन् माझ्याशी लग्न कर’, प्रेयसीच्या तगाद्याला वैतागून विवाहित तरूणानं उचललं टोकाचं पाऊल

 

High Court | पत्नीची देखभाल करणे कायदेशीर प्रकारे पतीची जबाबदारी, HC ने फेटाळली याचिका