MLA Amol Mitkari | कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – अकोला (Akola) जिल्ह्यातील हिंगणा येथे शिवव्याख्याते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) हे एका कार्यक्रमावेळी भर सभेमध्ये बोलत होते. त्यावेळी बोलतानाच त्यांना अचानकपणे अर्धांगवायूचा (paralyzed attack) सौम्य झटका आल्याने आमदार मिटकरी (MLA Amol Mitkari) यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

अकोला जिल्ह्यातील बिफॉर्म कॉलेजमध्ये (Beform College) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमा दरम्यान आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनतर मिटकरी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe)  यांनी लिहिलेली ‘माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली…’ ही छक्कड गाण्यास सुरुवात केली. गायला सुरुवात करतास अचानक अमोल मिटकरी यांचा दणदणीत आवाज खाली बसला आणि त्यांचा चेहरा वाकडा होत असल्याचे निदर्शनास आले. असं जाणवू लागल्याने तातडीने उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन त्यांना सांभाळलं. त्यानंतर तातडीने खासगी रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आलं.

या दरम्यान, अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य (paralyzed attack) झटका आला होता. म्हणून कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.
सध्या मिटकरी यांची प्रकृतीत आज सुधारणा झाली आहे.
तसेच, ‘माझी प्रकृती आता ठीक असून कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे मला भेटायला येऊ नये,
मी आता ठीक आहे, अशी विनंती देखील आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Web Title : MLA Amol Mitkari | ncp leader amol mitkari was paralyzed attackd while speaking at the rally at akola

 

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज !
ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन, जाणून घ्या कधी आणि कसे?

Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका,
बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे