विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे बागडेंचा नवा विक्रम

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावावर एक नवे रेकॉर्ड तयार झाले आहे. हरिभाऊंच्या कामामुळे किंवा त्यांच्या यशस्वी कारकीर्दीमुळे हे रोकोर्ड झालेले नाही. सध्या अनेक आमदार आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षांतर करत आहेत त्यामुळे सर्वात जास्त राजीनामे घेण्याचे रेकॉर्ड हरिभाऊ बागडे यांनी केले आहे.

सध्या कोणतेही अधिवेशन नाही मात्र तरीही अनेक आमदार हरिभाऊंना शोधताहेत याचे कारण म्हणजे पक्षांतर करण्यासाठी अनेकांना राजीनामे द्यायचे आहेत. लोकसभा निडणूक झाल्यापासून हरिभाऊंनी तब्बल २६ राजीनामे मंजूर केले आहेत.

राजीनामा देणारा आमदार हरिभाऊंना कोठेही शोधून काढतो आणि राजीनामा देतो. कधी विमानतळावर, कधी मुबंईत तर कधी राहत्या घरीसुद्धा आमदार येऊन हरिभाऊंकडे राजीनामा सुपूर्त करून जात आहेत. त्यामुळे कोणतेही अधिवेशन नसताना हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारांची गर्दी दिसून येते.

या अनुभवाबद्दल मात्र हरिभाऊंनी एक वेगळी गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, आमदारांच्या राजीनाम्यावर मला ना भाजप वाले आधी सांगतात ना शिवसेनेवाले, थेट आमदार भेटूनच सध्या राजीनामा देऊन जातात.

आतापर्यंत या आमदारांनी दिले राजीनामे –
– १९ आमदारांनी शिवसेना आणि भाजप प्रवेशासाठी राजीनामे दिले आहेत.
– हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला.
– गिरीश बापट, हेमंत पाटील, इम्तियाज जलील, बाळू धानोरकर यांनी लोकसभा लढवण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.
– आमदार अनिल गोटे आणि आमदार आशिष जाधव यांनी पक्षावर नाराज होऊन राजीनामा दिला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या