MLA Anil Bhosale | शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण ! आमदार अनिल भोसलेंचा चौथ्यांदा जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी (Shivajirao Bhosale Co Operative Bank Ltd) आमदार अनिल भोसले (MLA Anil Bhosale) यांचा जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळण्यात (Bail Application Rejected) आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र हिवसे (Additional Sessions Judge Ravindra Hivse) यांनी हा आदेश दिला. लेखा परीक्षा अहवाल कोर्टात दाखल झाला व समता तत्वांच्या कारणांवरुन जामिनाची मागणी अनिल भोसले (MLA Anil Bhosale) यांनी केली होती. याला मूळ फिर्यादी व गुंतवणुकदारांचे वकील सागर कोठारी (Adv. Sagar Kothari) आणि सरकारी वकील विलास पठारे (Adv. Vilas Pathare) ह्यांनी विरोध केला. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अनिल भोसले यांचा जामिनाची मागणी फेटाळून लावली.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवाहर प्रकरणी आमदार अनिल भोसले (MLA Anil Bhosale) यांनी विशेष न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादी व गुंतवणूकदारांचे (Investors) वकिली सागर कोठारे यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले, भोसले यांनी एकाच वेळी मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) आणि विशेष न्यायालय, पुणे येथे जामिनाचा अर्ज केल्याची माहिती दोन्ही न्यायालयांपासून लपवून ठेवत न्यायालयाची फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आणून दिले.
तसेच आमदार भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले (Reshma Bhosle) यांच्यासह 12 जणांना अद्याप अटक (Arrest) झालेली नाही. केवळ न्यायवैद्यक लेखा परीक्षा अहवाल दाखल झाला म्हणजे घडामोडीत बदल झाला असे म्हणता येणार नाही. यावेळी कोठारी यांनी भोसले यांच्या दबावामुळे लेखा परीक्षकाविरुद्ध कारवाई झाल्याचे निदर्शनास आणून देत भोसले यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. न्यायालयाने कोठारी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन अनिल भोसले यांचा जामीन फेटाळून लावला.
Web Title :- MLA Anil Bhosale | Shivajirao Bhosle Bank Misconduct Case
! MLA Anil Bhosle’s bail was revoked for the fourth time
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
All India Bank Employees Association (AIBEA) | मोदी सरकार कामगार संघटनांविरोधात – सी. एच. व्यंकटचलम्