आमदार अनिल भोसले पुन्हा सक्रिय होणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिका निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पासून दुरावलेले विधान परिषद सदस्य आमदार अनिल भोसले पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. नुकतेच काही महिन्यांपूर्वी भीमथडी जत्रेत पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सोबत दिसलेले भोसले यांच्या घरी नुकतेच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली. त्यामुळे भोसले पुन्हा पक्षीय कार्यात सहभागी होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेत महत्वाची पदे भूषविलेले आमदार अनिल भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस ने दुसऱ्यांदा विधान परिषदेवर संधी दिली. मात्र दोन वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीच्या वेळी पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासोबतच्या संबंधात दुरावा आल्यानंतर भोसले काहीसे पक्षा पासून दूर गेले. एवढेच नव्हे तर भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी भाजप च्या सहयोगी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी देखील झाल्या. यानिमित्ताने आमदार भोसले हे भाजपच्या जवळ गेल्याची चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात मात्र अनिल भोसले यांनी मतदार संघात संपर्क ठेवतानाच सक्रिय राजकारणा पासून दूर राहणेच पसंद केले. अशातच भोसले यांचे व्याही खासदार संजय काकडे यांनी भाजप पासून फारकत घेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा केल्याने भोसले हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान दोन अडीच महिन्यांपूर्वी शेतकी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित केलेल्या भीमथडी जत्रेला शरद पवार यांनी भेट दिली. योगायोगाने याच जत्रेत भोसले यांचा सेंद्रिय शेती उत्पादनाचा स्टॉल होता. शरद पवार यांनी या स्टॉल ला भेट देत उत्पादनाची माहिती घेत भोसले यांच्यासोबत स्नेह संवादही साधला होता. तर मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भोसले यांची निवासस्थानी भेट घेत चर्चा ही केली.

लोकसभेचे रण तापले आहे. येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील विधानसभा निवडणुकी मध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी अनिल भोसले यांनी राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवली होती. आघाडी मध्ये हा मतदार संघ कोणत्या पक्षाकडे जाणार यावरही भोसले यांचे राजकीय समीकरण ठरणार असल्याची चर्चा भोसले यांच्या निकटवर्तीयांकडून सुरू आहे.

२२ वर्षीय युवतीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांची अस्वस्थता वाढली  खा. गांधी यांची अस्वस्थता कशामुळे वाढली हे वाचा सविस्तर

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली तर सर्वप्रथम शेतकरी कर्ज माफी : सुप्रिया सुळे

भाजपमध्ये ‘त्यांच्या’ वर्तणुकीला कंटाळलेले खा. काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार