MLA Ashish Jaiswal | ‘तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाहीत, मातोश्रीत कुणाला एन्ट्री नाही, मग राज्य कोण चालवतंय?’; शिंदे गटातील आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Ashish Jaiswal | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात राजकीय संघर्ष उफाळला आहे. सध्या शिंदे गटात अपक्षांसह 45 हून अधिक आमदार आहेत. खरंतर सत्तासंघर्षाचा सातवा दिवस असून शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं दिसतंय. अशातच गुवाहाटीत शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार आशिष जायस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना काही प्रश्न केले आहेत. ‘तुम्ही वर्षा सोडलं, तुम्ही मंत्रालयात जात नाही आणि मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही. मग राज्य कोण चालवतंय?’ असं जायस्वाल यांनी म्हटलं आहे.

 

सोमवारी आशिष जायस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांच्या विरोधात रामटेकला निषेध सभा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. माजी खासदार प्रकाश जाधव (Prakash Jadhav) हे ह्या निषेध रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना आशिष जायस्वाल म्हणाले की, “मी तुमच्या पक्षात आहे का की तुम्ही माझा निषेध कराल? मी अपक्ष आहे, मला संविधानाने अधिकार दिला आहे की मी कुठेही जाऊ शकतो. मी 2019 ला बंडखोर होतो, आज नाही. तेव्हा माझ्या निषेध सभा घ्यायच्या होत्या, तेव्हा घेतल्या का? तेव्हा तर तुम्ही भाजप-शिवसेनेसाठी घेतल्या. आज काय निषेध करता,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

दरम्यान, निधी वाटप करताना महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government)
काही मंत्री मोबदल्याची आणि हिस्सेदारीची अपेक्षा ठेवतात का? या प्रश्नावर शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी गंभीर आरोप केला होता.
या बाबत ”मला असेच अनुभव आले आहेत आणि अनेक आमदारांना असेच अनुभव आलेले आहेत.
हे अनुभव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार असून जर त्यानंतरही बदल झाले नाही तर आम्ही वेगळा विचार करु,”
असं जयस्वाल यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- MLA Ashish Jaiswal | mla ashish jaiswal on cm uddhav thackeray from guwahati eknath shinde shiv sena maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold-Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Pune Metro | पुणेकरांसाठी खुशखबर ! लवकरच हडपसर-पुलगेट भागातही धावणार मेट्रो

 

Maharashtra Political Crisis | राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकते का ? 16 आमदारांचे निलंबन होऊ शकते का ? जाणून घ्या कायदेतज्ञांचं मत