MLA Ashish Shelar | ‘तुमच्यात हिंमत असेल तर…’, आशिष शेलारांचं सभागृहात बाळासाहेब थोरातांना आव्हान (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar) यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद गुरुवारी महाराष्ट्राच्या विधिमंडळात (विधिमंडळात उमटले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी माफी मागीवी अशी मागणी सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या आमदारांनी (Shivsena MLA) लावून धरली. यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) आणि भाजप आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी सभागृहा गोंधळ घातला. तसेच काँग्रेस आमदारांनी राहुल गांधींच्या वतीने माफी मागावी अशी मागणी आशिष शेलार (MLA Ashish Shelar) आणि संजय शिरसाट यांनी केली.

शेलार आणि शिरसाट यांनी विधानसभेत गोंधळ घातल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी सर्व आमदारांना गोंधळ थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी आमदारांनी नार्वेकर यांचे न ऐकता गोंधळ सुरुच ठेवला. अखेर नार्वेकर यांनी 10 मिनिटांसाठी विधानसभा स्थगित करण्याची घोषणा केली आणि ते सभागृहातून निघून गेले.

हिंमत असेल माफी मागा

आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) म्हणाले, राहुल गांधी यांनी भारताबाहेर जाऊन भारताचा अपमान केला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी. शेलार यांनी काँग्रेस नेत्यांकडे माफीची मागणी केली. शेलार काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) म्हणाले, बाळासाहेब थोरात, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही याप्रकरणी माफी मागा.

 

 

शिरसाट-शेलार आक्रमक

शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट आणि भाजपचे (BJP) आमदार आशिष शेलार राहुल गांधी
यांच्या वक्तव्यावरून आक्रमक झाले होते. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हा गोंधळ थांबवण्याचा
प्रयत्न करत होते. त्यावेळी नार्वेकर शेलारांना म्हणाले, मी तुम्हाला बोलण्यासाठी वेळ देतो.
यावर शेलार म्हणाले, तुम्ही काय देणार आहात? हे लोक (काँग्रेस) माफी मागणार आहेत का?
गोंधळ थांबत नसल्याचे पाहून नार्वेकर यांनी सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी स्थगित केली.

Web Title :- MLA Ashish Shelar | apologize for rahul gandhi statement on veer savarkar ashish shelar challenges balasaheb thorat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ahmadnagar Accident News | देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 ठार तर 11 जखमी

Chandrapur Crime News | खळबळजनक ! पहाटेच्या सुमारास मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना आढळले दोघांचे मृतदेह