वाघोलीत वाहतूक कोंडी त्वरीत सोडवा आमदार अशोक पवार यांच्या PWD ला सूचना

पुणे : (लोणी काळभोर) पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – अहमदनगर महामार्गावरील वाघोली येथील सततची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाघेश्वर चौक आव्हाळवाडी फाटा चौक तसेच केसनंद फाटा चौकातील रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी प्रस्तावित कामास होत असलेल्या विलंबासंदर्भात आमदार अशोक पवार यांनी आढावा घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना कामाला गती देऊन फेब्रुवारी 2020 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

शिरुर हवेली विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक पवार यांनी सध्या कामासाठी कंबर कसली असून अनेक कामे कासवगतीने चालू असल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पुणे अहमदनगर महामार्गावर वाघोली येथे अलिकडे वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य माणूस बेजार झाला आहे. यात प्रामुख्याने वाघेश्वर चौक आव्हाळवाडी फाटा चौक तसेच केसनंद फाटा चौकातील कोंडी मोठी असते. यावर येथे रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागास सुचवले. कामासाठी निधी उपलब्ध करून दिला परंतु आजपर्यंत यात प्रगती झाली नाही.

यावर आमदार अशोक पवार यांनी येथील कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी केली त्यानंतर मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली यात अधिक्षक अभियंता विष्णू पालवे कार्यकारी अभियंता शाम कुंभार उप अभियंता राजश्री दिवाण क्षेत्रीय अभियंता अमित हापसे ठेकेदार किशोर विटकर उपस्थित होते. या बैठकीत कामात येत असलेल्या अडचणीवर चर्चा झाली. पुलाचे रुंदीकरण अंतर्गत गटारे पाणी पुरवठा पाईपलाइन तसेच पादचारी मार्गास दुकानदारांचा होणारा विरोध विज वाहतूक वाहिन्या स्थलांतरीत करणे विद्युत जनित्र स्थलांतरीत करणे या अडचणी आहेत. या अडचणी वर संबंधित विभागाला कळवून मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तर हे काम फेब्रुवारी 2020 अखेर पूर्ण करावे असे सांगितले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like