नवनिर्वाचित आ. अशोक पवारांचा नुकसानग्रस्त भागात दौरा, कुंजीरवाडी – आळंदी म्हातोबाच्या शेतकर्‍यांशी संवाद

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – ओढ्यावरील अतिक्रमणामुळे पुराच्या पाण्याने स्वतःच वाट काढल्याने अनेकांची शेते, घरे पाण्याखाली गेले. तर रस्त्याचा मोठा भराव वाहून गेल्याचे वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. आळंदी म्हातोबा येथून उगम पावलेला बोरकर ओढा धुमाळमळा बोरकरवस्ती मार्गे बेटवस्ती, पाटीलवस्ती असा मुळा-मुठा नदीला भेटतो. परंतु गेल्या काही वर्षात पुणे-सोलापूर महामार्गापर्यंत अस्तित्वात असलेला हा ओढा गायब झाला.
Rivulet
जमीनीला सोन्याचे भाव आल्याने अनेकांनी हा ओढा संपुष्टात आणला. गेल्या दहा-वीस वर्षात या ओढ्याला कधीच पूर आला नाही. परंतु या वर्षी परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला हा ओढा पुराने भरुन वाहू लागला. बोरकरवस्ती पर्यंत थोडाफार अडथळा सोडला तर ओढ्याचे अस्तित्व आहे परंतु त्यापुढे ओढाच शिल्लक नाही त्यामुळे पुराचे पाणी उभ्या पिकात शिरले. अनेकांची घरे पाण्याने वेढली, तर पाटीलवस्ती येथे जुना पुणे-सोलापूर रोड या पुराने उखडून वाहून गेला. पावसाचा मुक्काम आणखी चार पाच दिवस असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे या शेताची नदी झालेली आहे. येथील पाणी आणखी दोन महिने तरी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

यावर महसूल खात्याने त्वरित हरकतीत येऊन या ओढ्याला पूर्ववत स्वरुप द्यावे अशी मागणी थेऊरच्या माजी सरपंच नंदा यशवंत कुंजीर यांनी केली आहे. कारण यावर्षी पावसाने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. येथील शेतजमीनीची मोजणी करुन ओढा मोकळा करावा असे त्या म्हणाल्या. या प्रश्नावर शिरुर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांनी कुंजीरवाडी – आळंदी म्हातोबा भेटी दरम्यान या ओढ्यासंदर्भात लक्ष घालून यावर लवकर मार्ग काढण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देणार असल्याचे सांगितले. आमदार अशोक पवार यांनी या भागातील पूर परिस्थिती तसेच शेती नुकसानीची पाहणी केली. यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, आळंदी म्हातोबाच्या सरपंच कविता शिवरकर, उपसरपंच सरिता भोंडवे, गणेश जवळकर, भगवान जवळकर, लक्ष्मण भोंडवे, प्रकाश वाल्हेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या