MLA Ashutosh Kale | शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी NCP चे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती

अहमदनगर : MLA Ashutosh Kale | राज्य शासनाने शिर्डी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची घोषणा केली असून अध्यक्षपदी कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे (shivsena) जगदीश हरिश्चंद्र सावंत Jagdish Harishchandra Sawant (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विश्वस्त मंडळांच्या 17 सदस्यांपैकी 11 जणांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे
(MLA Ashutosh Kale) वर्चस्व राहिले आहे. त्यात राष्ट्रवादीचे 5, काँग्रेसचे 4 आणि शिवसेनेच्या 2 नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उर्वरीत 6 सदस्यांची नावे पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे.

संस्थांनच्या अध्यक्षपदी विविध क्षेत्रातील तज्ञ असावेत, असे बंधन न्यायालयाने घातले आहे. त्यानुसार आमदार काळे यांची अभियांत्रिकी क्षेत्रातून तर सावंत यांची कायदा क्षेत्रातून निवड केल्याचे राजपत्रात म्हटले आहे. विश्वस्त मंडळांवर नेमणूक केलेल्यांची नावे अशी : अविनाश अप्पासाहेब दंडवते, सचिन रंगराव गुजर, सुहास जर्नादन अहेर, एकनाथ भागचंद गोंदकर (काँग्रेस), अनुराधा गोविंदराव आदिक, सुरेश गोरक्षनाथ वाबळे, जयवंत पुंडलिकराव जाधव, महेंद्र गणपतराव शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस), राहुल नरेन कनाल (शिवसेना)  याशिवाय शिर्डी नगरपंचायतीचे अध्यक्ष हेही पदसिद्ध विश्वस्त असतात.

हे देखील वाचा

Pune Journalist Arrest | व्यावसायिकाकडे 5 लाखांची खंडणी मागणार्‍या पत्रकार अर्जुन शिरसाठ याला अटक; यापूर्वीही उकळली होती पाच लाखांची खंडणी, फोनवरील संभाषणातून उघड

Pune Crime | ‘आला रे आला, तुमचा बाप आला’ गजा मारणेच्या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल करणऱ्यावर MPDA कारवाई

Pune Honeytrap Case | पुण्यातील भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून केली खंडणीची मागणी; तोतया पत्रकारासह टोळी गजाआड, सापडले CBI चे बनावट ओळखपत्र

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : NCP MLA Ashutosh Kale appointed as President of Shirdi Sansthan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update