MLA Atul Bhatkhalkar | अतुल भातखळकर यांना अटक; BJP आमदार म्हणाले – ‘पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Atul Bhatkhalkar | एमएमआरडीएने (MMRDA) मेट्रो स्टेशनबाबत केलेली कारवाई आणि मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या (Kurar metro station) कामाचा वाद चांगलाच रंगला आहे. कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर आज (शनिवार) सकाळी पोलिसांकडून करवाई करण्यात आली. या कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. या कारवाई विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी आंदोलन करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

MLA Atul Bhatkhalkar arrested mumbai police aarey police station

कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी घरांची पाडापाड सुरु होती. या ठिकाणी पोहचून कारवाईला भातखळकर यांनी विरोध सुरु केला. कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात (arrest) घेतले. या प्रकरणी त्यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर (state government) निशाणा साधला आहे. मला अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे.

ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस

ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तेडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करुन आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत, असे अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

गिरगाव पॅटर्न का नाही

मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचं आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले, त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही ? गिरगाव पॅटर्न का नाही, असा सवाल भतखळकर यांनी केला आहे.

कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार

भातखळकर यांनी ट्विटद्वारे सरकारवर हल्ला चढवला आहे. कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी…. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करुन तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार असल्याची माहिती भातखळकर यांनी दिली.

हे देखील वाचा

Mayor Kishori Pednekar | पोलखोल ! ‘उद्यानास टिपू सुलतान नाव देण्यास भाजपचा विरोध, पण पूर्वी BJP नेच दिला होता होकार’

Personal Loan | तुम्हाला सुद्धा पैशांची गरज आहे का? इथं मिळेल मिनिटात 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  MLA Atul Bhatkhalkar arrested mumbai police aarey police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update