बच्चू कडू यांनी IAS अधिकाऱ्यावर का उगारला लॅपटॉप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
महापरिक्षा पोर्टलच्या भोंगळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बच्चू कडू यांनी माहिती तंत्रज्ञान संचालकांशी हुज्जत घातली. त्यावेळी संतापलेल्या बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यावर अंगावर लॅपटॉप उचलून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले  होता. या घटनेमुळे मंत्रालयात एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर, आमदार कडू यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबतचा खुलासा दिला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bfcc45e7-c239-11e8-b617-7522606415fa’]
सरकारी अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी दिवस रात्र एक करून परीक्षेची तयारी करतात, सरकार जागा कमी जाहीर करते पण लाखो विद्यार्थी परीक्षा शुल्क देतात व परीक्षेला बसतात. राज्य सरकारने mpsc मार्फत घेणारी परीक्षा नवीन खाजगी IT कंपनी नेमून घेण्याचे जाहीर केले. या कंपनीने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये गोळा केले व सरकारने महापरीक्षा पोर्टल तयार करून महाराष्ट्रात 5-6 परीक्षा घेतल्या या ऑनलाईन परीक्षेत प्रचंड गोंधळ व अपारदर्शकता असल्याच्या तक्रारी हजारो विद्यार्थ्यांनी सरकारकडे केल्या होत्या. पण कोणतीच कारवाई सरकार करत नव्हते.
[amazon_link asins=’B01MRRD4XC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cf0d750a-c239-11e8-9c61-bfdb33b9cd4f’]
आमदार बच्चू कडू यांच्याकडे या विद्यार्थ्यांनी संपर्क करून त्यांच्या वेदना मांडल्या. त्यावेळी आमदार कडू यांनी 22 तारखेस मुख्यमंत्री व अधिकारी यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या समस्या कळवल्या. या पत्रावर अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली, याची माहिती घेण्यासाठी आमदार बच्चू भाऊ कडू कार्यकर्त्यांसोबत महाराष्ट्र राज्य माहिती संचालनालय संचालक प्रदीप पी. या अधिकाऱ्याच्या मंत्रालयातील केबिनमधे दाखल झाले. बच्चू कडूंनी शांतपणे विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिकाऱ्यास सांगितले व आपण माझ्या पत्रावर केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती विचारली. या अधिकाऱ्याने तुमच्या पत्रावर मी कनिष्ठ अधिकाऱ्याकडून अहवाल मागितला आहे, हे सरकारी उत्तर दिले.
त्यानंतर बच्चू कडू त्या  अधिकाऱ्यास हा विषय महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी कसा महत्वाचा आहे, हे समजावून सांगत होते. पण अधिकारी न ऐकता हे कशाला माझ्या केबिनमध्ये आले आहेत, असा आव आणत होता. तरीही, पुढील पाच मिनिटे त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यात व तुम्ही कशी तात्काळ संबंधित कंपनीवर कारवाई करू शकतात हे समजावले. पण अधिकाऱ्याचे एकच होते की, मी अहवाल मागवला आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या टेबलवरील लॅपटॉप उचलून अधिकाऱ्याच्या टेबलवर आपटला. त्यानंतर त्याच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला, असा खुलासा बच्चू कडू यांनी आपल्या फेसबुक अंकाऊटवरुन दिला आहे.