आमदार बच्चू कडू यांनी भिरकावला IAS अधिकाऱ्यावर लॅपटॉप

मुंबई  :  पोलीसनामा ऑनलाईन
महापरिक्षा पोर्टलच्या भोंगळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बच्चू कडूंना माहिती तंत्रज्ञान संचालकांनी उडवाउडीची उत्तरे दिली. त्यामुळे बच्चू कडूंना आपला राग अनावर झाला आणि त्यांनी माहिती तंत्रज्ञान संचालक प्रसाद पी यांच्या दिशेने लॅपटॉप भिरकावला. तसेच दोन दिवसात कारवाई न केल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याने मंत्रालयात एकच खळबळ उडाली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’321d5790-c19d-11e8-ae50-e74fb2d7219c’]
महापरिक्षा पोर्टलच्या भोंगळ कारभाराबाबत बुधवारी आमदार बच्चु कडू आणि प्रहार विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आय टी संचालक प्रसाद पी यांच्या मंत्रालयातील कार्यालयात गेले होते. मात्र यावेळी प्रसाद यांनी आमदारांना करता हु… देखुंगा…आप को क्यू बतावू… अशा भाषेत उत्तरे दिली. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांना राग अनावर झाला, त्यांनी टेबलावरील लॅपटॉप प्रसाद पी यांच्या दिशेने भिरकावला. यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी परीक्षेच्या नावाखाली अधिकारी आय टी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन पैसे खात असल्याचा आरोप आमदार कडू यांनी केला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’321d5790-c19d-11e8-ae50-e74fb2d7219c’]
राज्य शासनाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ज्या महापरिक्षा पोर्टल द्वारे घेतल्या जातात त्याच्या ढिसाळ कारभारामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप प्रहार विद्यार्थी संघटनेने केला आहे. गेल्या काही महिन्यात अन्न व पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता अधिकारी, नगरपरिषद नगरपंचायत भरती या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. मात्र,यावेळी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. तसेच अडचणी सोडविण्यासाठी विभागामार्फत दिलेल्या फोन, ई मेल चा काहीही अर्थ नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापरिक्षा पोर्टल बंद करून पून्हा सरकारच्या mpsc.gov.in या पोर्टल द्वारे सर्व परीक्षा घ्याव्यात अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेने केली आहे. या प्रकरणी 27 सप्टेंबर रोजी आमदार कडू यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात, तर 1 ऑक्टोबरला मुंबईत विद्यार्थी आंदोलन करणार आहेत.