MLA Bacchu Kadu | आमदार बच्चू कडूंची प्रकृती खालावली, अमरावतीमधून नागपूरला केलं शिफ्ट

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांचा बुधवारी पहाटे रस्ता ओलांडत असताना अपघात (Accident) झाला. या अपघातात बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. बच्चू कडू यांच्यावर अमरावतीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र सध्या त्यांना नागपूरच्या रुग्णालयात नेण्यात आलं असून सकाळी प्रकृती उत्तम असल्याचे सागणाऱ्या बच्चू कडूंची प्रकृती दुपारी कशी खालावली, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. महत्वाचे म्हणजे त्यांना अमरावतीमधून नागपूरला शिफ्ट (Shifted) करताना त्यांच्या प्रकृतीचा अपडेट्सबाबत गोपनीयता पाळण्यात आल्याची चर्चा आहे.

 

दुपारी अडीच-तीनच्या सुमारास बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांची प्रकृती खालावल्याचे कारण देत डॉक्टरांनी त्यांना नागपूरला (Nagpur) हलवण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर बच्चू कडू यांना तातडीने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना भाजप नेते (BJP Leader) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, मी बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी जाणार होतो. परंतु ते नागपूरला गेल्याचे समजले. आम्ही नागपूरला गेल्यानंतर त्यांची भेट घेणार आहोत.

 

बच्चू कडू यांच्या अपघातानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी संशय व्यक्त केला आहे.
यासाठी गेल्या काही काळात बच्चू कडू यांनी सातत्याने घेतलेल्या भूमिकेचे संदर्भ त्यांनी दिले आहे.
सध्याच्या सरकारविरुद्ध बच्चू कडू यांनी घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना?
असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :- MLA Bacchu Kadu | bacchu kadu shifted to nagpur hospital from amravati after amravati accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | खासदार नवनीत राणांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने; म्हणाल्या…

Cabinet Incentive Scheme | भीम अ‍ॅप आणि रूपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची भरीव तरतूद

Hasan Mushrif | चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ ऑफरबाबत बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…