MLA Bacchu Kadu | भुजबळांकडून ५ कोटींचा बोभाटा; बच्चू कडूंनी सांगितलं फक्त इतक्याच मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

मुंबई : आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची आकडेवारी खोडून काढत किती मराठ्यांच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न आहे, याचे गणित मांडले आहे. तसेच शिंदे समिती रद्द झाली नाही, तर छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, ओबीसीमध्ये मराठा घुसतोय, असे काहीही नाही. कारण कोकणातील, विदर्भातील मराठा कुणबी झाला.
पण, चार-पाच जिल्ह्यातलाच मराठा कुणबी होत नाही. त्यासाठीच गाजावाजा होत आहे.
हे सगळे राजकीय श्रेय घेण्याचे काम आहे. ज्यांचे काहीच राहिले नाही, त्यांचे जातीच्या नावाने चांगभले आहे.
ते आता नळावरच्या भांडणासारखे भांडायला लागले, याचे मला नवल वाटते.

बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी मराठा आणि कुणबी आकडेवारी सांगताना म्हटले की, मराठ्यांना वेगळे काढून ओबीसींचे भले होणार नाही, ओबीसींची भले करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत.
एकूण ९ जिल्ह्यातील कुटुबांची संख्या ४ लाख एवढी आहे. ८ जिल्हे पकडले तर ८ जिल्ह्यातील एकूण संख्या ३२ लाख
इतकी होईल. त्या ३२ लाखातील अर्धे बाद झाले, मग राहिले अर्धे १६ लाख. १६ लाखाला ४ ने गुणल्यास ६४ लाख होतात.
आता, ३६ लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. राहिला विषय ३६ लाखांचा, त्याला तुम्ही विरोध करत आहात.
पण, इकडे मराठा कायदेशीर मार्गाने कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे, ते कोणीही रोखू शकत नाही.

कडू यांनी म्हटले की, आता, १० ते १५ लाख मराठे राहिले आहेत. मात्र, यांनी बोभाटा केला की ५ कोटी मराठे ओबीसीत
सामिल होणार. विदर्भातील बच्चू कडू ५० वर्षांपासून सामिल झाला आहे. विदर्भातील झाला, खान्देशातील झाला,
पश्चिम महाराष्ट्रातील झाला, कोकणातीलही ५० वर्षे अगोदर झाला आहे. त्यामुळे, मराठ्यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळणारच आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | पुणे : प्रेमविवाहाची इच्छा अधुरी, संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक अपघातात जोडीदाराचा मृत्यू तर तरुणी गंभीर जखमी

Pune Crime News | कन्सलटन्सी कंपनीतील महिलेचा विनयभंग, डेक्कन परिसरातील प्रकार

ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात