MLA Bacchu Kadu | बच्चू कडू यांनी निर्वाणीचा इशारा देताच शिंदे गटात वेगवान हालचाली, दीपक केसरकरांनी केलं सूचक विधान

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील समर्थक आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी पक्षाला म्हणजेच गटाला वेगळी भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्यासोबत सुरु असेलेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता शिंदे गटात (Shinde Group) हालचालींना वेग आला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सूचक विधान केले आहे.

बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासोबत दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्या वतीने ते बोलत असतील, तर मला त्यातील वस्तूस्थिती माहीत नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसावेत, अशी आमची अपेक्षा आहे. जो व्यक्ती मंत्री होणार आहे, त्याला थोडा संयम ठेवला पाहिजे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि शिंदे गटात त्यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

दीपक केसरकर यांनी पुढाकार घेत बच्चू कडू यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, केसरकर यांनी कडूंवर आक्रमकपणे आरोप करणाऱ्या रवी राणा यांच्याबाबत कोणतेही भाष्य करणे टाळले. त्यामुळे शिंदे गटाकडून बच्चू कडू यांची मनधरणी सुरु आहे. दीपक केसरकरांनी बच्चू कडू यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) स्थान मिळेल, असे संकेत दिले आहेत.

अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांचे वाद अमरावती जिल्ह्याला माहीत आहेत.
एकमेकांवर आरोप करणे, एकेरी उल्लेख करणे हे दोघांचे नित्याचे काम झाले आहे.
रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन 50 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता.
त्यावर कडू संतापले होते. त्यांनी त्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आव्हान केले आहे.
अन्यथा आपण वेगळा विचार करणार असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले.
आपल्यासोबत आठ ते दहा आमदारांचा गट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून
रवी राणा यांना माझी माफी मागायला लावावी, असे कडू म्हणाले होते.

Web Title :- MLA Bacchu Kadu | eknath shinde camp mla deepak kesarkar advice to bacchu kadu over conflict with ravi rana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पोलिसांचा टिपर असल्याच्या संशयावरुन तरुणावर टोळक्याने तलवारीने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Mumbai Crime | धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने पत्नीला कारने चिरडलं; CCTV फुटेज आले समोर (व्हिडिओ)