MLA Bacchu Kadu | ‘दंगल करणारा हिंदू असो वा मुस्लीम, त्यांचे हात छाटले पाहिजे’, आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात दंगली (Riots) घडल्या आहेत. औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, नगर या ठिकाणी दंगील घडल्या आहेत. दोन गटात झालेल्या दंगलीमध्ये काही जणांचा जीव गेला आहे तर काहीं जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अलीकडेच अकोला (Akola Riots) येथे झालेल्या दंगलीत एका युवकाचा मृत्यू झाला तर दोन पोलिसांसह आठजण जखमी झाले. राज्यातील वाढत्या दंगलीवरुन आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी मोठं विधान केलं आहे. दंगल घडवणारा हिंदू असो वा मुस्लीम त्यांचे हात छाटले पाहिजेत असे बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी म्हटले आहे.

अकोला येथे झालेल्या दंगलीवरुन राज्यातील राजकीय वातावरण (Maharashtra Politics News) चांगलेच
तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान प्रहार संघटनेचे
(Prahar Sanghatana) नेते आणि आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी हे विधान केले आहे.
ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

महाराष्ट्रात घडत असलेल्या दंगलीबाबत बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले, दंगल करणारा कुणीही असो…
मग तो हिंदू (Hindu) असो वा मुस्लिम (Muslim) असो किंवा इतर कुठल्याही जातीचा असो… जे-जे दंगल
पेटवण्यासाठी पुढे आले असतील, त्यांचे हात छाटले पाहिजेत. दंगलीच्या माध्यमातून शहरात अशांतता निर्माण
करुन विकासात बाधा आणण्याचे काम करण्यात येत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

बच्चू कडू पुढे म्हणाले, महाराष्ट्रात बेरोजगारी प्रचंड आहे. दररोज कुणी ना कुणी आत्महत्या (Suicide) करत आहे.
औषधं मिळत नाहीत, म्हणून लोक मरत आहेत. असं असताना एकमेकांच्या विरोधात कुणी तलवारी काढत
असेल आणि शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात असले तर हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे.
त्यांच्याविरोधात कारवाई होणं फार महत्त्वाचं आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असला तरी कारवाई झालीच पाहिजे,
अशी मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली.

Web Title :  MLA Bacchu Kadu | then we should cut their hand hindu or muslim bachchu kadu statement on akola riots

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून विमाननगर-लोहगाव परिसरातील 2 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई, केलं वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबध्द

Pune Crime News | पुण्यातील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिकास 5 कोटीची खंडणी मागणार्‍यांना पकडताना गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून गोळीबार, खंडणीबहाद्दर सोलापूरचे तथाकथित पत्रकार