दानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन

शेतकऱ्यांना साले म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. जालन्यातून दानवेंना पराभूत करूनच परत येऊ, असा निर्धारही कडू यांनी केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दानवे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ceb34a31-be44-11e8-858b-fba931c15bbe’]

रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना साले म्हटलं होतं. तूर खरेदीबद्दल बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. ‘इतकी तूर खरेदी केली, तरी रडतात साले,’ असं दानवे म्हणाले होते. त्यावेळी बच्चू कडूंनी दानवेंच्या विधानाचा निषेध केला होता. त्यानंतर आता कडू यांनी दानवेंविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या दानवेंविरोधात आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभेची निवडणूक लढवू, असं कडू आधीच म्हणाले होते.

जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं बच्चू कडूंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दानवे यांना पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पण त्यांनी केला आहे. दानवेंच्या मतदारसंघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट असल्याची टीका त्यांनी केली. दानवेंच्या मतदारसंघात रेतीची तस्करी चालते, अवैध दारु विक्री चालते, अशा शब्दांमध्ये त्यांनी दानवेंवर तोंडसुख घेतलं.

सर्वच इच्छुक यंदा उभे राहिले गणपतीच्या दारी

प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी ही माहिती दिली. रावसाहेब दानवे हे शेतकरी विरोधी असल्यानं त्यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवतानाच शेतकऱ्यांच्या हितासाठीच ही निवडणूक लढवत असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवण्यात येत आहेत. शिवाय कडू यांनी जालन्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची माहितीही मागवली आहे.