MLA Bacchu Kadu | ‘…तर मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडू’, आमदार बच्चू कडूंचा थेट इशारा (व्हिडीओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात (Shinde-Fadnavis Government) दंड थोपटले आहेत. शेतकरी (Farmers) आणि मजुरांच्या (Laborers) विविध प्रश्नावरुन आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे ‘जन एल्गार मोर्चा’ची हाक दिली आहे. अमरावतीमध्ये केलेल्या भाषणातून बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी मंत्रालयातील कृषी सचिवांच्या (Agriculture Secretary) कार्यालयात साप सोडण्याचा इशारा दिला आहे. मजुरांच्या प्रश्नांवर पुढील 15 दिवसांत तोडगा काढा, अन्यथा मंत्रालयात साप सोडू, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

शेतमालास भाव देण्याची याच काय कोणत्याही शासनाची औकात नाही, शेतमजुराला साप चावला तर पैसे मिळत नाहीत. यावर आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पैसे देण्यास होकार दर्शवला. मात्र कृषी विभागाचे सचिव सचिन ढवळे (Secretary Sachin Dhawale) त्यामध्ये आठकाठी आणतात, आता पंधरा दिवसात निर्णय न झाल्यास मंत्रालयात साप सोडू, सापाला जात, धर्म समजत नाही, असा निर्वाणीचा इशारा आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी सरकारला दिला आहे.

एका गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार आणि दुसऱ्या गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार नाहीत,
हा अन्याय आम्ही सहन करणार नाहीत. शेतात राब-राब राबणाऱ्या मजुराला मदत झालीच पाहिजे,
असं म्हणत पंधरा दिवसात यावर तोडगा निघाला नाही तर मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडल्याशिवाय राहणार नाही,
असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या (Prahar Jan Shakti Party) वतीने आमदार बच्चू कडू,
आमदार राजकुमार पटेल (MLA Rajkumar Patel) यांच्या नेतृत्वात बुधवारी क्रांतिदिनी शेतकरी,
शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर आमदार कडू यांनी मोर्चात सहभागी झालेल्यानं संबोधित केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhimashankar Temple | भीमाशंकर मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदी, मंदिर प्रशासनाचा निर्णय