MLA Bachchu Kadu | ‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल (Maharashtra MLC Election Result) जाहीर झाला आहे. या निकलावर प्रतिक्रिया देताना प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. विधानपरिषदेच्या निकालाचा विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होत नसतो, परंतु मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) न केल्यास त्याचा फटका सरकारला बसू शकतो असा इशारा बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी दिला आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते.

नुकत्याच झालेल्या पदविधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन लाखांच्या आसपास मतदान झाले आहे. याचा कोणताही परिणाम विधानसभा (Vidhan Sabha) किंवा लोकसभेच्या निकालावर (Lok Sabha Result) होत नसतो. मात्र हे जरी खरं असलं तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने कामे खोळंबू लागली आहेत. त्यामुळे जनतेत नाराजी आहे, आणि याचा फटका सरकारला बसू शकतो, असा इशारा बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी दिला.

या निवडणुकीमध्ये जुन्या पेन्शनचा मुद्दा समोर आल्याने असे निकाल लागले आहेत.
हे मतदार संघटित असल्याने त्यांचा निकाल आणि ताकद दाखवू शकले.
परंतु यांच्या कित्येक पटीने जास्त असणाऱ्या असंघटित शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्गाचे प्रश्न यापेक्षाही
गंभीर आहेत. तरी देखील त्याकडे लक्ष दिले जात नसल्याची खंत बच्चू कडू यांनी बोलून दाखवली.

राज्यात एका मंत्र्याकडे अनेक खात्यांचा पदभार आहे.
तसेच अनेक जिल्ह्यांना एकच पालकमंत्री असल्याने लोकांची कामं होत नाहीत.
अशावेळी मंत्रिमडळ विस्तार केल्यास लोकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
मात्र, अशीच स्थिती राहिली तर लोकांच्या रोषाला या सरकारला सामोरे जावे लागेल, असा ही इशारा बच्चू कडू यांनी दिला.

Web Title :- MLA Bachchu Kadu | bachu kadu warns if cabinet is not expanded eknath shinde devendra fadnavis govt will suffer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

Jaya Bhardwaj | ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमके प्रकरण?