
MLA Bachchu Kadu | राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलणार?, बच्चू कडूंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Bachchu Kadu | आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections-2024) भाजप (BJP) 240 जागा तर शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) 48 जागा लढवणार असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सूचक विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) म्हणाले, बावनकुळे यांनी केलेलं विधान ही भाजपची भूमिका आहे की, चुकून त्यांनी वक्तव्य केलं हे तपासलं पाहिजे. आम्ही शिंदे फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) पाठिंबा दिला आहे. युतीचं अजून आमचं ठरलेलं नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची, नाही करायची, किती जागा देणार, नाही देणार याबाबत अद्याप काहीही ठरलेलं नाही. येणाऱ्या काळात त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. ते अमरावतीमध्ये बोलत होते.
आगामी निवडणुकीत तुम्ही भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत राहणार का असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना बच्चू कडूंनी सूचक विधान केलं आहे. पुढच्या दीड वर्षात काय होणार हे काही आत्ताच सांगता येणार नाही.
गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री (CM) बदलले. तीन वेळा शपथविधी झाला.
त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार हे आत्ताच सांगता येणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
बच्चू कडू यांच्या या विधानामुले राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Web Title :- MLA Bachchu Kadu | prahar president mla bachchu kadus reaction on the shiv sena bjp alliance
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले